Posts

Showing posts from October, 2024

परतूर तालुका कॉग्रेस कमिटी च्या वतीने आधुनिक बुथ कमिटी प्रशिक्षण शिबिर प्रभारी पक्ष निरीक्षक महेश शर्मा यांच्या उपस्थितीत संपन्न....

Image
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण    परतुर-मंठा विधानसभा मतदार संघातील काँग्रेस  पक्षाचे बुध कमिटी प्रशिक्षण 359 बुध करिता आयोजित करण्यात आले होते. बुध कमिटीच्या प्रशिक्षणाला तालुक्यातील बुथ कमिटी पदाधिकारी मोठया संख्येने सहभागी झाले होते      या वेळी बुथ कमिटीला संबोधित करताना प्रभारी पक्ष निरीक्षक महेश शर्मा म्हणाले की तुम्ही सुरेश जेथलिया यांना आमदार बनवा मंत्रीपद देण्याची जिम्मेदारी मी घेतो.उमेदवारीबद्धल कुठलाही संभ्रम मनामध्ये बाळगू नका. परतूर विधानसभेची जागा ही काँग्रेस पक्षच लढावणार असून तनमण धनाने कामाला लागा असे सुचक वक्तव्य प्रभारी पक्ष निरीक्षक महेश शर्मा  यांणी बुथ प्रशिक्षण शिबीरात मार्गदर्शन करताना त्यांनी प्रतिपादन केले, या वेळी प्रशिक्षणाला मा.आमदार सुरेश जेथलिया, सहप्रभारी बालासाहेब देशमुख,नितीन जेथलिया,विशाल  तौर, ता.अध्यक्ष बाबाजी गाडगे ,बाळासाहेब अंभिरे,इंद्रजीत घनवट,लक्ष्मण शिंदे,मंजुळदास सोळंके,बाबुराव हिवाळे ,रहेमु कुरेशी,सादेक खतीब,राजु भुजबळ, अण्णासाहेब खंदारे,माऊली वायाळ, सुरेश जिजा सवणे, पांडू आबा कुरध...

नवनाथ आढे (नायक) याची /लमाण तांडा समृद्ध योजनेच्या समीतीवर नियुक्ती

Image
परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण महाराष्ट्र ग्राम विकास विभाग शासन निर्णय संत सेवालाल महराज बंजार लमाण तांडा समृद्ध योजनेच्या अशासकीय सदस्य पदी नवनाथ शेषराव आढे यांची तीन वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे     या समीतीच्या माध्यमाततून बंजारा समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी या सोबतच सामाजाची सेवा करण्याची संधी मला शासनाने दिली आसल्याचे नवनाथ आढे यांनी सा. चकमक सी बोललताना सांगीतले     ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्र.तांडा सुधार २०१९/प्र.क्र./अस्था ५ दि.२३/०२/२०२४ अन्वेय संत सेवालाल महाराज बंजारा /लमाण तांडा समृद्धी योजना अंमलबजावनी बाबत ,लमाण तांडा वस्ती घोषीत ,गावठाण जाहीर करणे तांड्याला महसूली गाव घोषीत करण्याची कार्यवाही करणे ग्रामपंचायत स्थापन करण्याची कार्यवाही करणे इ.व इतर अनुषंगिक कार्यवाहीसाठी जिल्हाधीकरी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समीती गठीत करण्यात आलेली आहे यासंदर्भा ग्रामपंचायतीकडून  कामाच्या स्वरूपाचे प्राधान्य क्रमाक देऊन जी नीकडीची कामे आहेत त्या संदर्भात मुख्यकार्यकरी आधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखालील समीती...

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पादचारी पुलाच्या उभारणीनिमित्त वाहतुकीच्या मार्गात बदल

      जालना प्रतीनीधी नरेश अन्ना श्रीपत  जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील फुट ओव्हर ब्रिजची उभारणीनिमित्ताने अंबड चौफुली-मोतीबाग जाणारा रस्ता रविवार दि.20 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजेपासून ते 21 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 1 वाजेपर्यंतच्या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. तरी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 कलम 36 अन्वये राष्ट्रीय महामार्ग 753 वरील अंबड चौफुली-मोतीबाग ते छत्रपती संभाजीनगर चौफुली मार्गावरील वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. असे आदेश पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी जारी केले आहेत. पर्याय मार्ग म्हणून बीड-अंबडकडून येणारी वाहतुक व छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहतुक  ही जालना येथील मंठा चौफुली-नाव्हा चौफुली-देऊळगाव राजा चौफुली- कन्हैयानगर-भोकरदन चौफुली बायपास मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जाईल. सदरचे आदेश दि.20 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजेपासून ते 21 ऑक्टोबर 2024 रोजी 1 वाजेपर्यंतच्या कालावधीत पुलाची उभारणी पुर्ण होईपर्यंत लागू राहतील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे. -*-*-*-*-

विधानसभा सार्वत्रिक निवडणुक-2024,परवाना धारकांना शस्त्रास्त्रे बाळगण्यास निर्बंध;शस्ञ जवळच्या पोलिस ठाण्यात जमा करावेत

Image
   जालना प्रतीनीधी नरेश अन्ना श्रीपत  भारत निवडणुक आयोगाच्या सुचनानुसार जालना जिल्ह्यामध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणुक-2024  चा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. जालना जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातुन निवडणुक घोषित झाल्यापासुन निवडणुक निकाल घोषित होईपर्यत, परवाना दिलेले शस्त्रास्त्रे वाहुन नेण्यावर व बाळगण्यास निर्बंध लागू करण्यात येत आहेत. तरी असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ती, दंडाधिकारी शक्ती प्रदान केलेले अधिकारी, पोलिस अधिकारी-कर्मचारी, बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेवरील अधिकारी-कर्मचारी तसेच सराफा यांच्या व्यतिरिक्त तसेच मा. उच्च न्यायालयातील जुन्या रिट पिटीशन 2009/2014 च्या आदेशास अधीन राहुन इतर सर्व परवानाधारक व्यक्तींनी परवाना दिलेले शस्ञास्ञे वाहुन नेण्यावर व बाळगण्यास आदेशान्वये बंदी घालण्यात आली आहे.  शस्ञ परवानाधारकांनी आपले शस्ञ जवळच्या पोलिस ठाण्यात जमा करावेत. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर एक...

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचे बीगूल वाजले

Image
प्रतीनीधीनी नरेश /समाधान खरात महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे.सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात होता. दरम्यान, (दि. 15 रोजी ) केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दुपारी 3.30 वाजता दिल्लीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी निवडणूक आयोगाकडून झारखंड आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यंदा महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून, 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे.    महाराष्ट्रात एकूण 1 लाख 186 मतदान केंद्र आहेत. ग्रामीण भागात 57 हजार 601 आणि शहरी भागात 42 हजार 582 केंद्र आहेत. महाराष्ट्रात 9 कोटी 63 लाख मतदार हक्क बजावणार आहेत. तसेच वरिष्ठ नागरिक आपल्या घरून देखील मतदानाचा हक्क बजावू शकतील. असं देखील यावेळी सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्रात एकूण मतदान केंद्र – 1 लाख 186 ग्रामीण मतदान केंद्र – 57 हजार 601 शहरी मतदार केंद्र – 42 हजार 582 महाराष्ट्रात म...

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीनिमित्त पत्रके, भित्तीपत्रकासाठी मुद्रणावर निर्बंध

जालना प्रतीनिधी नरेश अन्ना   आगामी महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूक- 2024 चा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाकडून लवकरच जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने पत्रके, भित्तीपत्रके आदि मुद्रणांचे संनियंत्रणासाठी जालना जिल्ह्यातील सर्व मुद्रणालयाचे लक्ष लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 चे कलम 127-क च्या आवश्यकतेकडे वेधण्यात येत आहे. अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.  कोणत्याही व्यक्तीला, निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रकाच्या दर्शनी भागावर त्याच्या मुद्रकाचे आणि प्रकाशकाचे नाव व पत्ता नसेल असे कोणतेही मुद्रित वा प्रकाशित करता येणार नाही. निवडणुकीसाठी असणारी पत्रके, छापील साहित्य यावर प्रकाशक आणि मुद्रक यांची नावे असणे आवश्यक आहे. कोणत्याही व्यक्तीला निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रक ती स्वतःच त्याचा प्रकाशक आहे या बद्दलचे त्याने स्वतः स्वाक्षरी केलेले व त्यावर दोन ओळखणाऱ्या व्यक्तींनी साक्षांकित केलेले अधिकथन मुद्रकास दिल्याशिवाय मुद्रकाने मुद्रण करू नये. दिलेल्या सुचनांप्रमाणे निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रक प्रकाशित क...

बलासाहेब आकात यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी.

प्रतीनीधी कैलाश चव्हाण            आज दि. 2 ऑक्टोबर 2024 बुधवार रोजी सातोना खुर्द येथे   सत्य आणि अहिंसेचा संदेश देणारे राष्ट्रपिता  महात्मा  गांधीजी तसेच देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री  जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली.या  निमित्त महामानवाच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.             कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री बालासाहेब आकात यांनी महामानवाच्या कार्याचा आपण सर्वांनी आदर्श घेत त्यांनी दाखवलेल्या दिशेने वाटचाल केले पाहिजे असा मोलाचा संदेश  देत उपस्थितांना   बालासाहेब  आकात यांनी शुभेच्छा दिल्या.            यावेळी पंचक्रोशीतील  प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.