Posts

Showing posts from September, 2024

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चालू शैक्षणिक वर्षासाठी १०० जागेची मान्यता

Image
     जालना, दि.३०(नरेश अन्ना):- शासनाकडून जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी दुसऱ्या सुनावणीत चालू  शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता १०० जागेची मान्यता देण्यात आली आहे.     शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा, बांधकाम आदीची कामे मार्गी लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत.  तरी जालना जिल्ह्यातील सर्वांसाठी आरोग्य सेवेतील महत्वाची  बाब म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मैलाचा दगड ठरेल, असे मत जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी व्यक्त केले.

परतूरचे पोलीस निरीक्षक मच्छिन्द्र सुरवसे यांना बंधू शोक

Image
परतूर प्रतिनिधी येथील पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मच्छिन्द्र सुरवसे यांचे जेष्ठ बंधू गोरख तुकाराम सुरवसे यांचे दि 26 सप्टेंबर 2024 रोजी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. बीड जिल्ह्यातील चाकरवाडी त्यांच्या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते 62 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी,भाऊ, दोन मुले, एक मुलगी,भावजई, सुना,जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कंडारी (परतुर), "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" टप्पा-२ अभियानात तालुक्यातून प्रथम

        जालना प्रतीनीधी नरेश अन्ना   शासनाच्यावतीने राबविण्यात आलेल्या शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" टप्पा - २ अभियानांतर्गत झालेल्या स्पर्धेत कंडारी (परतूर), ता. घनसावंगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावल्याने शाळेच्या शिरपेच्यात मानाचा तुरा लागलेला आहे.       शाळेने शैक्षणिक गुणवता, आरोग्य तपासणी, महावाचन चळवळ, विद्यांजली पोर्टल, ऑनलाइन नोंदणी व त्याची पूर्तता, वर्ग सजावट, शालेय भिंतीवरील रंगरंगोटी, आर्थिक साक्षरता, क्रीडा स्पर्धा, व्यक्तिमत्व विकासासह विविध उपक्रमांतील विद्यार्थी सहभाग, शाळा परिसराचे सौदर्यीकरण, प्लास्टिकमुक्त शाळा, तंबाखू मुक्त शाळा, परसबाग, विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा* आदी निकषांची पूर्तता झाल्याने शाळेची प्रथम क्रमांकासाठी निवड झाली.        समस्त गावकरी व पालक यांनी केलेल्या सहकार्यामुळेच हे सर्व शक्य झाले आहे. त्याबद्दल सर्व गावकरी पालक वर्ग यांचे खूप खूप धन्यवाद.      आपण वेळोवेळी असेच सहकार्य करत राहा, उत्तरोत्तर शाळ...

८ ऑक्‍टोबरला मॉडेल कॉलेजमध्ये जिल्‍हास्‍तरीय ‘आविष्‍कार’चे आयोजन

जालना प्रतिनिधी समाधान खरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जिल्‍हास्‍तरीय आविष्‍कार अधिवेशनाचे आयोजन दि.८ ऑक्‍टोबर रोजी मॉडेल कॉलेज, घनसावंगी येथे करण्‍यात आले आहे.  विद्यार्थ्‍यांमधील सुप्‍त नावीन्‍यपूर्ण वैज्ञानिक प्रतिभा आणि क्षमतांचा आविष्‍कार व्‍हावा, त्‍यांच्‍यामध्‍ये संशोधन जाणिवा विकसित होऊन त्‍यांना अधिछात्रवृत्तीच्‍या स्‍वरूपात बळ मिळावे यासाठी राजभवनद्वारे २००६ पासून ‘आविष्‍कार’ या आंतरविद्यापीठीय संशोधन व नवोपक्रम स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात येते. यावर्षीचा राज्‍यस्‍तरीय ‘आविष्‍कार’ डॉ . बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथे जानेवारी २०२५ मध्‍ये संपन्‍न होणार आहे. यासाठीची पूर्वतयारी म्‍हणून कुलगुरू प्रा. विजय फुलारी यांच्‍या मार्गदर्शनाखाली जिल्‍हास्‍तरीय आविष्‍कार अधिवेशनाचे आयोजन करून त्‍यानंतर विद्यापीठस्‍तरीय आविष्‍कार संपन्‍न होणार आहे.  शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांमधील संशोधन कल्‍पकता व नवोपक्रमांना अधिकाधिक चालना मिळावी, ग्रामीण भागातील अधिकाधिक विद्यार्थी सहभागी व्‍हावेत यासाठी यावर्षीचा आविष्‍कार प्रथमत: जिल्‍हास्‍तरा...

प्रभावाच्या मुल्यांकनावर कॉंग्रेसचा उमेदवार जाहीर होणार,एकदिलाने एकत्र येत जाहीर झालेल्यां उमेदवाराला सहकार्य करावे कॉंग्रेस च्या मेळाव्यात प्रभारी महेशजी शर्मा यांचा इच्छुकांना सल्ला

परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण             परतूर मंठा मतदारसंघात कॉंग्रेस चा प्रभाव जास्त असून या परिसरात कॉंग्रेस चा उमेदवार निवडून आण्यासाठी प्रभावी उमेदवाराला निश्चित उमेदवारी मिळेल मात्र तेव्हा आजच्या सर्व इच्छुकांनी एकदिलाने एकत्र येत उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराला सहकार्य करावे असे अवाहन कॉंग्रेस पक्षाचे परभणी लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी महेश शर्मा यांनी केले. मा.आ.सुरेशकुमार जेथलिया यांच्या प्रमुख नियोजना खाली परतूर येथे आयोजित कॉंग्रेस पक्षाच्या बुथप्रमुख व पदाधीकारी यांच्या मेळाव्यात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर सहप्रभारी मा.बाळासाहेब देशमुख, मा.आ.सुरेशकुमार जेथलिया,मा.आ.राजेश राठोड,राजेभाऊ देशमुख ,किसनराव मोरे,अण्णासाहेब खंदारे,बाळासाहेब आकात ,सुरेश पवार,कल्याणराव बोराडे,युवानेते नितीन जेथलिया,बाबासाहेब गाडगे,नीळकंठ वायाळ,इंद्रजित घनवट, सिद्धेश्वर सोळंके, लक्ष्मण शिंदे आदी मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी आपल्या प्रमुख मार्गदर्शन पर मनोगतात महेश शर्मा यांनी परतूर मतदारसंघाच्या आढाव्याचा दाखला देत या परिसरात कॉंग्रेस चे वातावरण चांगले असल्...