सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत


जालना प्रतीनिधी नरेश अन्ना
 जालना शहरातील अंबड चौफुली भागातील , योगेश नगर येथील चोरी प्रकरणी तालुका पोलीस ठाणे जालना येथे गुरनं.373/2024  कलम 457, 380 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता, सदरचा चोरीची घटना 8 जून 2024 रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली होती, सदरचा गुन्हातील आरोपी शोध घेणे बाबत जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना सूचना दिल्या त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदरचा गुन्हा उघडकीस आननेबाबत सूचना देवून मार्गदर्शन केले, त्या अनुषंगाने दिनांक 20 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार हे नमूद गुन्ह्यातील आरोपी गोपिसिंग प्रल्हाद सिंग टाक या गुन्हेगारास  गांधीनगर येथून ताब्यात घेऊन त्याच्या कडे गुन्ह्याच्या  चौकशी केली असता  गुन्ह्याची कबुली दिली गुन्ह्यात चोरी केलेले तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हस्तगत करण्यात आले 
     सदर ची  कार्यवाही अधीक्षक अजय कुमार बंसल व अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपणी यांच्या मार्गदर्शनखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव , सपोनि योगेश उबाळे , सपोनि शांतीलाल चव्हाण, पोउपनी राजेंद्र वाघ, सोबत पोलीस अंमलदार कांबळे ,कृष्णा तंगे,लक्ष्मीकांत, आडेप, सागर बाविस्कर , सुधीर वाघमारे, संदीप चिंचोले, धीरज भोसले, योगेश सहाने, कैलास चेके, सौरभ मुळे, सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली आहे,

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन