रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....


 
 परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
 परतुर तालुक्यातील रायगव्हाण येथे अति उत्साहात सांगता करण्यात आली.
कथा प्रवक्त्या परमपूज्य गुरु माऊली संध्या दीदीजी यांनी तीन दिवशी शिवमहापुराण कथेमध्ये श्रवण , मनन, चिंतन अध्यासन , यावर सविस्तर मार्गदर्शन करून सर्व भाविक भक्तांना शिव महापुराण कथेचे महात्म्य आपल्या रसाळ वाणी मधून पटवून सांगितलेले आहे. तसेच यावेळी गावकऱ्यांच्या वतीने भव्य दिव्य कमळाचे फुल बनवून परमपूज्य माऊलींचे आसन कमळाच्या गादीमध्ये केले होते.विशेष म्हणजे श्रीक्षेत्र तामिळनाडू येथील रामेश्वर मंदिराची रोषणाई करण्यात आली होती. सर्व कार्यक्रमाचे नियोजन माऊली सेवा समिती रायगव्हाण यांनी केले...माऊलींची रायगव्हाण येथील हनुमान मंदिर येथून भव्य दिव्य रथा मधून प्रतन करा माऊली सेवा समितीच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदरणीय श्रद्धा दीदी जी एडवोकेट सुप्रीम कोर्ट नवी दिल्ली यांनी केली. यावेळी सिद्धेश्वर केकांन सह सर्व गावकऱ्यांची उपस्थित होती.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड