सामाजिक वनीकरणच्या शेतकऱ्याच्या बांधावर वृक्ष लागवड लाभर्थ्यांची चौकशी करण्याची मागणी


परतूर प्रतिनिधी/हनुमंत दवंडे 

तालुक्यात सामाजिक वनीकरण परिक्षेत्रात शेतकऱ्याच्या बांधावर वृक्ष लागवडी प्रस्ताव मंजुर लाभर्थ्यांची चौकशी करण्याची सामाजिक कार्यकर्त्ये पांडुरंग शेजुळ यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की सामाजिक वनीकरण परिक्षेत्र कार्यालया, परतुर या अतर्गत सन २०२०-२१ मध्ये वृक्ष लागवड योजने अंतर्गत तालुक्यातील अर्ज मागविण्यात आली होती. प्राप्त प्रस्ताव मंजुर झालेले आहे. मंजुर लार्भाथ्यांना करारपत्र बंदपत्र / शपथपत्र या तिन अटी बंधनकारक ठेवण्यात येऊन त्या मध्ये शंभर रुपयाच्या बॉड पेपरवर शपथपत्र पत्र मागितले आहे. पत्रकामध्ये नियम व अटी प्रमाणे यापूर्वी कोणत्याही शासकीय निमशासकीय खासगी संस्थेत वृक्षलागवडीच्या करिता अनुदान घेतले नाही किंवा योजना चालू असे पर्यंत लाभ  घेणार नाही. असे बंधन असतांना सामाजिक वनीकरण कार्यालयाने यापूर्वी लाभ घेतलेल्या लाभर्थ्यांना प्रस्ताव मंजूर करून परत दुसर्‍यांदा लाभ देण्यात आला आहे. तर जाणीव पूर्वक नियमात बसणार्‍य लाभर्थ्यांना डावलण्यात आले आहे. सामाजिक वनीकरणने बांधावर वृक्ष लागवड योजनेत निवडलेल्या लाभर्थ्यांची चौकशी समिती नेमवून चौकशी करावी. तसेच कृषि विभाग मार्फत महात्मा गांधी रोजगार हमी अंतर्गत लाभ घेतलेल्या लाभर्थ्यांना दुबार लाभ देण्यात येऊ नये. अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर सामाजिक कार्यकर्त्ये पांडुरंग तुळशीराम शेजुळ यांची स्वाक्षरी आहे.  

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत