बँकांनी पीककर्जाचे उद्दिष्ट तात्काळ पूर्ण करा,बी-बियाणेसह खतांची कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या.दोन महिन्यात घरकुल योजनेचे काम पूर्ण करा,माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी विविध विभागांची घेतली आढावा बैठक


परतूर(प्रतिनिधी)

सद्यस्थितीत पेरणी जवळ आलेली असताना बँकांनी तात्काळ पीककर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा पंतप्रधान किसान सन्मान योजना किंवा संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत असणारे मानधन अडवणूक करण्यात येत असल्याबाबत विविध तक्रारी प्राप्त झाल्या आहेत अडवणूक करण्यात येऊ नये. अनेक बँकांनी अद्याप आपले उद्दिष्ट पूर्ण केले नाही ते तात्काळ पूर्ण करावेत अन्यथा गय केली जाणार नाही असा खणखणीत इशारा माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी परतूर विधानसभा मतदारसंघातील मंठा, परतूर, नेर-सेवली येथील बँकेच्या शाखा व्यवस्थापकांना केल्या.

मागील वर्षी बोगस बियाणे विक्री करण्यात आले होते त्यात विविध खाजगी कंपन्या बरोबर महाराष्ट्र शासनाचे बियाणे महामंडळ देखील समाविष्ट होते या वर्षी तो प्रकार होऊ नये यासाठी ७० टक्केपेक्षा अधिक उगवण क्षमता असणारे बियाणे शेतकऱ्यांना दिले जावे तसेच बी-बियाणे खते यासाठी कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता देखील कृषी विभागाने घ्यावी अशा सूचना यावेळी आढावा बैठकीदरम्यान माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी दिल्या.

यावेळी बैठकीसाठी उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, तहसीलदार सुमन मोरे, रूपा चित्रक, श्रीकांत भुजबळ, गटविकास अधिकारी अंकुश गुंजकर, पाणीपुरवठा चे उपअभियंता ओंकार बोडखे, मजीप्रा चे उप अभियंता पाथरवाड, सहाय्यक निबंधक प्रणव वाघमारे, भाजपा जालना जिल्हा उपाध्यक्ष माऊली शेजुळ, परतूर भाजपा तालुकाध्यक्ष रमेश भापकर, जालना भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश टकले, सभापती रंगनाथ येवले, उपसभापती नागेश घारे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विक्रम उफाड, महेश पवार, सुधाकर बेरगुडे, गणेश सोळंके, रवी सोळंके, माऊली सोळंके, नारायण दवणे, सोपान वायाळ, एकनाथ जाधव, प्रभाकर जाधव, गोविंद खरात यांची उपस्थिती होती

या आढावा बैठकीदरम्यान आमदार लोणीकर यांनी परतूर मंठा नेर सेवली या भागातील कोळी लसीकरण संदर्भात देखील आढावा घेतला यावेळी १८ ते ४४ वयोगटातील लोकांना लस देण्याबाबत सर्व ग्रामीण रुग्णालय व आरोग्य विभागाने तयारी करावी तसेच लसीचा तुटवडा भासणार नाही याची काळजी घ्यावी अशी सूचना देखील यावेळी केली महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत वाढीव बिल संबंधित रुग्णांना परत मिळणार आहे त्याबाबत माननीय उच्च न्यायालयाने सूचना केली आहे त्याप्रमाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे विहित नमुन्यातील अर्ज करावा या संदर्भात आरोग्य विभागाने जनजागृती करावी अशी सूचना यावेळी लोणीकर यांनी केली

पावसाळ्यापूर्वी नगरपालिका नगरपंचायत व ग्रामपंचायतीने स्वच्छता कार्यक्रम हाती घेण्यात यावा व पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करावीत पंतप्रधान आवास योजना रमाई घरकुल योजना तसेच शेतकरी योजनेअंतर्गत विविध घरकुलांचे बांधकाम तात्काळ करण्यात येणे बाबत देखील लोणीकर यांनी यावेळी सूचना केली त्यासाठी मोफत रेती देणे व ज्या लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम केलेले आहे त्यांचे प्रलंबित असलेले देखे तात्काळ अदा करण्यात यावे अशा सूचना देखील यावेळी लोणीकर यांनी दिल्या

परतूर तालुक्यातील १७३ गावांची वॉटर ग्रीड व मंठा तालुक्यातील ९५ वॉटर ग्रीड कामाचा आढावा यावेळी घेण्यात आला त्यातील परतूर वॉटर ग्रीड अंतर्गत ११८ गावांमध्ये वॉटर ग्रीड चे पाणी पोहोचले असल्याची माहिती लोणीकर यांनी यावेळी दिली उर्वरित ५५ गावांमध्ये लवकरच वॉटर ग्रीडचे पाणी पोहोचेल अशी माहिती यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली. वॉटर ग्रीड हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून तो सर्वांनी जपला पाहिजे असेही लोणीकर यावेळी म्हणाले. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुर्बन योजनेतील घरकुल योजनेची कामे पूर्ण करण्याचे आदेश यावेळी गटविकास अधिकारी यांना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली पुढे ते म्हणाले की येत्या दोन महिन्याच्या आत ही कामे पूर्ण करण्यात यावे.

यावेळी परतूर मंठा सह नेर सेवली सर्कल मधील वीज वितरण कामांचा आढावा देखील माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी घेतला त्यामध्ये पावसामुळे कोसळलेले विजेचे खांब तात्काळ दुरुस्त करण्यात यावेत मंठा तालुक्यातील खारीआर्डा परिसरातील व तालुक्यातील इतरही अनेक ठिकाणावरील वादळामुळे कोसळले आहेत त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी सूचना लोणीकर यांनी यावेळी केली पाणीपुरवठा योजनांना लागणारा वीजपुरवठा मंठा शहरातील मार्केट कमिटी मधील बंद असलेली लाईनची तार काढण्याबाबतच्या सूचना देखील लोणीकर यांनी यावेळी केली.

माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचा आढावा घेतला त्याअंतर्गत परतूर व मंठा शहरातील अद्यावत क्रीडांगण, परतूर शहरातील उड्डाणपूल, सेवली येथील पोलीस ठाणे, २५१५ अंतर्गत सिमेंट रस्ते, सभामंडप बांधकाम, आमदार निधी अंतर्गत सिमेंट रस्ते, सभामंडप, हायमास्ट लाईट यासह अर्थसंकल्पातील कामे, परतूर व मंठा येथील मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह, परतूर व मंठा येथील न्यायालय इमारतीची प्रलंबित कामे, डांबरीकरणाचे रस्ते, यासह पूर्णा, दुधना व गोदावरी नदीवरील पूल व पुलालगत असणाऱ्या रस्त्यांची अर्धवट राहिलेली कामे या सर्वांचा वेगवान आढावा लोणीकर यांनी घेतला विनाविलंब ची कामे पूर्ण करण्यात यावीत अन्यथा कारवाई करण्याचा इशारा लोणीकर यांनी यावेळी दिला.
=================
*वीज पडून मृत्यू प्रकरणी ०४ लाखाच्या धनादेशाचे लोणीकर यांच्या हस्ते वाटप*
मंठा तालुक्यातील केहाळ वडगाव येथील मंदाबाई गणपती आढे यांचे वीज पडून दुःखद निधन झाले होते सदर प्रकरणी स्वतः माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्तिशः लक्ष घालून निधी उपलब्ध करून दिला. मयताचे वारस पती गणपत चत्रू आढे यांना लोणीकर यांच्या हस्ते ०४ लक्ष रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला यावेळी शेषनारायण दवणे, गणेश दवणे यांच्यासह केहाळ वडगाव येथील नागरिक उपस्थित होते.

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले