भाजपा जालना जिल्हा उपाध्यक्ष गणेशराव खवणे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील विविध ठिकाणी ५१ वटवृक्षाची लागवड


मंठा(प्रतिनिधी)-
माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनरावजी लोणीकर साहेब व महाराष्ट्र राज्याचे भाजयुमोचे महामंत्री राहुल भैया लोणीकर यांचे निकटवर्तीय व अत्यंत विश्वासू जालना जिल्ह्याचे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मा. गणेशरावजी खवणे यांच्या वाढदिवसानिमित्त आज केहाळ वडगाव, वैद्यवडगाव, देेेवगाव खवणे येथील जिल्हा परिषद शाळा तसेच गायरान जमीन परिसरात  वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी तालुक्यात ५१ वट वृक्षांची लागवड करण्यात आली.

वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज असून गावातील प्रत्येक तरुण महिला सर्व शेतकरी बांधवांनी वृक्ष संगोपन करावे गाव परिसरात एक व्यक्ती एक झाड ही मोहीम राबवावी टिकवावे त्या वृक्षाचे पालकत्व घेऊन वृक्षाचे संगोपन करावे करुणा महामारी च्या काळात आपल्याला कृत्रिम ऑक्सिजनची गरज भासली असून भविष्यात तशी गरज भासू नये यासाठी वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यात ५१ वटवृक्षाची लागवड आपण करत आहोत वटवृक्ष लागवड इमागे सामाजिक धार्मिक व वैज्ञानिक दृष्टिकोन आहे तो प्रत्येकाने समजून घ्यावा व समाजहितासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड व संगोपन यावर विशेष भर द्यावा अशी प्रतिक्रिया भाजपा जालना जिल्हा उपाध्यक्ष गणेशराव खवणे यांनी वृक्ष लागवडी प्रसंगी दिली

प्रसंगी जालना जिल्ह्याचे उपाध्यक्ष गणेशरावजी खवणे व भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विलासरावजी घोडके तसेच  लोणीकर साहेब यांचे स्वीय सहाय्यक प्रा. सहदेव मोरे पाटील, मंठा तालुक्याचे भाजपाचे ता.सरचिटणीस शेषनारायण दवणे, भाजपाा युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष अनंत वैद्य माजी सरपंच रावसाहेब वैद्य केहाळ वडगावचे सरपंच बालासाहेब दवणे, उपसरपंच सुंदरराव दवणे, शिवाजीराव वैद्य ग्रा. सदस्य भीमराव खरात, ग्रा, सदस्य गणेशराव दवणे व सोशल मीडिया चे तालुका संयोजक ओंकार नाईक अंकुश वैद्यय अमोल वैद्य पप्पूू तौर  आदित्य दवणे, आकाश बनसोडे, दिलीप गवळी, दीपक रणवीर, विजय खरात, राजू साळवे, दत्ता साळवे, व नामदेवरावजी साळवे, कांबळे सर. नारायण हरणे सर तसेच सर्व तरुण मंडळी उपस्थित होती.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड