मराठा आरक्षणासाठी मराठ्यांसह बहुजन समाजाने 5 जूनच्या मराठा क्रांती संघर्ष मोर्चात सामील व्हावे*सचिन खरात


*परतुर(प्रतीनीधी)गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी  मा. आमदार विनायकराव मेटे संघर्ष करीत असून मराठ्यांना आरक्षण मिळावे, अशी महाराष्ट्रातील अन्य बहुजन समाजबांधवांची जनभावना आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाविरुद्ध निर्णय आल्यानंतर मराठा समाजात असंतोष निर्माण झाला असून  आ. विनायकरावजी मेटे यांच्यानेतृत्वाखाली बीडमध्ये मराठा क्रांती संघर्ष मोर्चा दि.5 जून रोजी मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्च्यात मराठा समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी जनभावना असणाऱ्या बहुजन समाजाने देखील या मोर्च्यात सहभागी होऊन मराठा समाजाला साथ द्यावी असे आवाहन सचिन खरात यांनी केले आहे. 
आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांनी १९०२ मध्ये सर्व प्रथम आरक्षणाची तरतूद करुन मागासलेल्या जातींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं. आज देशाची महासत्ता बनण्याकडे वाटचाल सुरू असताना मराठा समाजाची दैनिय अवस्था झालीय. शैक्षणिक, आर्थिक मागासलेपणाची स्थिती मराठ्यांवर ओढावली आहे. मराठ्यांवरील मागासलेपण दूर करून त्यांना ही विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची मराठा समाजाला आज गरज असून आरक्षणासाठी मराठा समाज गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे. अशी जनभावना तमाम बहुजन समाजात आहे. 
मात्र सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द करण्यात आल्याने आज पुन्हा रस्त्यावर उतरून आरक्षणासाठी संघर्ष करण्याची वेळ मराठा समाजावर आलीय.आ.विनायकरावजी मेटेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली ५ जूनला बीड मध्ये मराठा आरक्षण संघर्ष मोर्चा काढण्यात येत आहे. हा केवळ मोर्चा नसून आरक्षणाच्या लढ्यासाठी मोर्चा आहे. ही बघण्याची वेळ नसून मोर्च्यात प्रत्यक्ष सहभागी होण्याची वेळ असल्याचे म्हणाले. तसेच मागास जातींना शाहू महाराजांनी आरक्षण दिलं आज मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी बहुजन समाजाने मराठयांना साथ देऊन आरक्षणाच्या मोर्च्यात सहभागी होवून पाठींबा द्यावा, असे आवाहन ही  सचिन खरात यांनी  केले आहे

Comments

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात