अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या जालना प्रभारी जिल्हाध्यक्ष पदी पांडूरंग शेजूळ

  
परतूर –प्रतिनिधी

तालुक्यातील आनंदवाडी येथील  पत्रकार पांडुरंग तुळशीराम शेजुळ यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेशच्या जालना जिल्हा प्रभारी जिल्हाध्यक्ष एका पत्राद्वारे  राष्ट्रीय अध्यक्ष मनोहरराव सुने, प्रदेशाध्यक्ष कैलास देशमुख यांनी  केली आहे.
सदरील नियुक्ती ही अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या नियम व अटीच्या अधीन राहून केली जात असून कोणत्याही नियमबाहया कृती न करता समाज माध्यमातून आपल्या लेखणीतून जन सामान्य जनतेचे प्रश्न मांडून वाचा फोडून न्याय देण्याचे अविरत कार्य करावे. असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे. या नियुक्ती बद्दल परतूर पत्रकार संघाचे अध्यक्ष शेषराव वायाळ,राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी ढोबळे, सचिव दीपक हिवाळे,  शामसुंदर चित्तोडा, अजय देसाई, योगेश बरीदे, एम.एल. कुरेशी, आशीष गारकर, भारत सवने, आर.एम. नवल, राजकुमार भारुका, सरफराज नाईकवाडी, सुरेश कवडे, अशोक साकळकर, इम्रान कुरेशी, प्रभाकर प्रधान, संजय देशमाने, सागर काजळे, तारेख शेख, मुमताज अंसारी, राहुल मुजमुले, माणिक जैस्वाल, संतोष आखाडे, शेख असेफ, शेख अथर, कैलास चव्हाण, कैलास सोळंके, कृष्णा धोंगडे, सय्यद तय्यब, वाजेदभाई यांनी अभिनंदन केले आहे.

Popular posts from this blog

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश