न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरु पौर्णिमेच्या कार्यक्रम संपन्न

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा  न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज परतुर मध्ये गुरुपौर्णिमा निमित्त "जीवनातील गुरुचे महत्व" या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतला तसेच इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा या मंत्रावर शास्त्रीय पद्धतीने नृत्य सादर करून गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली.  नृत्य दरम्यान इयत्ता दहावीची विद्यार्थिनी संस्कृती संतोष झरेकर हिने जीवनातील गुरुचे महत्व सांगून शाळेतील सर्व शिक्षक वृंदाचे आभार मानले. या कार्यक्रमा दरम्यान संस्थेचे अध्यक्ष  नारायण  सोळंके ,संस्थेच्या सचिव छाया बागल तसेच व्हॉइस प्रिन्सिपल पूजा मोरे, शिक्षकवृंद व  शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना सिटी हॉस्पिटल कडून शालेय सहित्त्या चे वाटप.

परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
 परतूर येथील प्रसिद्ध अस्थीरोग तज्ञ, तथा सिटी हॉस्पिटल चे संचालक डॉ.सत्यानंद कराड व प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ.संध्याताई कराड यांच्या हस्ते पाटोदा येथील श्री समर्थ माध्यमिक विद्यालयातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वर्ग १० वी चे पुस्तकाचे संच वितरीत करण्यात आले आहे.
        या विषयी सविस्तर वृत्त असे की परतूर येथील प्रसिद्ध डॉक्टर तथा सिटी हॉस्पीटल चे संचालक सत्यानंद कराड हे दरवर्षी या शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना पुस्तक संच भेट देतात कोणताही मुलगा पुस्तकामुळे शिक्षणापासून वंचित राहू नये ,असे समाजात अनेक मुले आहेत की ते केवळ शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याने शिकण्याची इच्छा असूनही शिक्षण घेऊ शकत नाही ही बाब लक्षात आली म्हणून आपण हे काम करत असल्याचे कराड म्हणाले. पुढे बोलतांना कराड यांनी सांगितले की समाजात असे अनेक दानसुर व्यक्तीआहेत कि ते गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मदत करू शकतात त्यांनी पुढे येण्याची गरज आहे.
       यावेळी श्री समर्थ माध्यमिक विद्यालयाच्या वतीने डॉ.सत्यानंद कराड यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.या वेळी विद्यालयाचे शिक्षक आबासाहेब गाडेकर ,सी.एन.खवल , पांडुरंग डवरे,जी.प.चे शिक्षक श्री आढे सर , दवाखान्यातील कर्मचारी श्री शरद यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Comments