दिव्यांग व्यक्ती ना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील- आमदार बबनराव लोणीकर,आमदार लोणीकर यांच्या हस्ते परतूर येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार संपन्न,दिव्यांगांसह गुणवंत विद्यार्थ्यांशी आमदार लोणीकरांनी साधला संवाद


परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात संपूर्ण भारताला प्रगतीपथावर नेणारे सरकार केंद्रात कार्यरत असून त्यांच्या नेतृत्वात देशाची प्रतिमा अधिक उंचावली आहे मोदींचे सर्व घटकांवर बारकाईने लक्ष असून सबका साथ सबका विकास या ब्रीदवाक्य प्रमाणे सर्व घटकांचा विचार करत असताना दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी देखील पंतप्रधान मोदींनी घेतली आहे दिव्यांगाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी व सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे देखील यावेळी बोलताना श्री लोणीकर यांनी स्पष्ट केले.
    केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वपूर्ण बाबी हाती घेतल्या असून अस्थि व्यंग कर्णबधिर मूकबधिर यांच्यासह विविध प्रकारच्या दिव्यांग बांधवांच्या मदतीसाठी कानपूर येथील संस्थेच्या माध्यमातून कर्णयंत्र स्ट्रेचर सायकल यासारखे वेगवेगळे साहित्य दिले जाणार असून दिव्यांगांना सक्षम बनवण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे अगदी त्याचप्रमाणे आपण सर्वांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याची गरज असून दिव्यांगां विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असल्याचे देखील यावेळी लोणीकर यांनी म्हटले ग्रामीण रुग्णालय परतुर येथे आयोजित दिव्यांगांसाठीच्या विशेष शिबिराचे उद्घाटन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते आज करण्यात आले यावेळी अस्थि व्यंग कर्णबधीर मूकबधिर यास सर्व प्रकारच्या दिव्यांग बांधवांची तपासणी करून त्यांना देण्यात आलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे विविध प्रकारच्या सोयी सुविधा दिव्यांग बांधवांना देण्याचा मानस केंद्र व राज्य सरकारचा असल्याचे लोणीकरांनी यावेळी स्पष्ट केले त्याचप्रमाणे परतुर येथील पंचायत समिती कार्यालयाच्या हॉलमध्ये माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये नवोदय श्रीहरीकोटा येथील शैक्षणिक सहल दिल्ली येथील शैक्षणिक सहल भारतीय रिझर्व बँकेच्या वतीने घेण्यात आलेली प्रश्नमंजुषा परीक्षा त्याचप्रमाणे दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश होता याप्रसंगी बोलताना श्री लोणीकर म्हणाले की प्रत्येक विद्यार्थ्यांची स्वप्न ही मोठे असले पाहिजे प्रत्येकाने उच्च ध्येय गाठण्यासाठी मोठी महत्त्वाकांक्षा ठेवणे आवश्यक आहे आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांनी देखील आयएएस आयपीएस यासारख्या अशा अपेक्षा ठेवून त्यानुसार प्रचंड मेहनत करणे आवश्यक आहे असे करून आपल्या कुटुंबासह गावाचे तालुक्याचे आणि देशाचे नाव उंचावण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे देखील लोणीकरांनी यावेळी स्पष्ट केलेया वेळी परतुर भाजपा तालुका अध्यक्ष रमेशराव भापकर, आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शत्रुघ्न कणसे, उपसभापती रवी सोळंके परतुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संभाजीराव वारे संपत टकले जालना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सलमा हिराणी, गटविकास अधिकारी गोकनवार साहेब, डॉक्टर विशाल ठाकूर डॉक्टर नवले डॉक्टर मोरे डॉक्टर नीलवर्ण डॉक्टर ए एस मताने  यांची प्रमुख उपस्थिती होती.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड