गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीच्या अनुदानापासून अजूनही हजारो शेतकरी वंचित

तळणी प्रतिनिधी रवी पाटील 
   गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीच्या अनुदानापासून अजूनही हजारो शेतकरी वंचित आहेत गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे तळणी परिसरातील तसेच संपूर्ण मंठा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे शेकडो हेक्टर वरील सोयाबीन व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या नुकसान भरपाई पोटी शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली होती परंतु आज तागायत ती मदत बोटावर मोजण्या इतक्या शेतकऱ्यांना मिळाली आहे 
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर जर ही मदत शेतकऱ्याला मिळाली तर खरीप हंगामाच्या लागवडीसाठी ती मदत कामी येऊ शकते. आज रोजी अनेक शेतकऱ्यांकडे कापूस घरातच पडू नये कापसाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे तो तसाच पडून आहे तळणी परिसरातील तळणी वडगाव सरहद्द कोकरंबा देवठाणा उसवत कानडी लिंबखेडा इंचा टाकळखोपा वाघाळा दुधा व अन्य तळणी मंडळातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन व अन्य खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते
सन २०२२_२३च्या सपूर्ण खरीप हंगांमात परतीच्या पावसाने मोठा कहर केला होता हातात आलेले पिक उघडया डोळ्या देखत सडून गेल्याने शेतकर्याचे मोठे नुकसान झाले खरीपाचा खर्च सुध्दा निट वसूल झाला नाही उत्पन्न व लावगडीचा खर्च यातील मोठा फरक झाला 
गेल्या तीन ते चार वर्षापासून तळणीसह सपूर्ण तालुक्यात परतीच्या पावसाचा मोठा फटका बसत आहे कधी गारपीट तर कधी अतिवृष्टी या निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकर्याना बसला आहे गतवर्षी अनेक शेतकर्यानी पीक विमा सुधा सरक्षीत केला होता पण त्याची मदत खूपच तूटपूंजी मिळाली काही शेतकर्याची सुरक्षीत केलेली रक्कम सुध्दा वसूल झाली 

अतिवृष्टीचे अनुदान शेतकर्याच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी आधार झेराक्स बॅक पासबूक ची झेरॉंक्स तीन तीन वेळा तलाठ्याकडे जमा करण्यातच शेतकर्याचा बराच वेळ गेला वास्तविक पाहता या आधी सुध्दा शेतकर्याच्या खात्यामध्ये सरळ मदत पोच झाली सर्व शेतकर्याची बॅक खात्याची माहीती शासनाकडे उपलब्ध असताना सुध्दा आधार लिक करायचा घाट शासनाने घातला या वेळकाढू पणामुळे शेतकर्याचे अनुदान माञ लटकून ठेवले शेतकर्याचे कैवारी म्हणून घेणारे राजकीय पक्ष ही शेतकर्याची व्यथा कधी समजून घेणार आजही हजारो शेतकरी बँकेत चकरा मारत आहे बॅक प्रशासन व शेतकरी याच्यात अनेक वेळा कुरबूरी झाल्या आहेत या अनुदानाची थेट रक्कम शेतकर्याच्या खात्यात केव्हा पडते याची प्रतिक्षा शेतकरी करीत आहे खरीप हंगामाची सर्व कामे आटोपून शेतकर्याची डोळे आता आकाशाकडे फिरत .आहे खरीप हंगांमाच्या कामी ही मदत जर शेतकर्याना मिळाली तर मोठा आधार त्यांना मिळेल नसता खासगी सावकाराचा पर्याया शिवाय शेतकर्याकडे दुसरा पर्याय वाढती महागाई निसर्गाचा लहरीपणा व शासनाचे ढिसाळ नियोजनामुळे शेतकरी माञ गुदमूरून जात आहे लोकप्रतिनीधीनी या समस्ये कडे लक्ष देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे

तळणी शिवारातील दिड हजारा पेक्षा जास्त शेतकरी असून त्यापैकी तेराशे शेतकर्याचे आधार लिंक सदर्भातील कागदपञ सर्व जिल्हाच्या ठिकाणी पाठवण्यात आले आहे सामाईक क्षेञासदर्भात अडचणी आहेत खूप कमी शेतकर्याच्या खात्यामध्ये अतिवृष्टीचे अनुदान जमा झाले आहे ऑनलाईन प्रक्रिये मुळे विलंब लागत असेल 

गोपाल कुटे तलाठी तळणी सज्जा


अतिवृष्टीचे कुठलेच अनुदान प्राप्त नाही सरळ खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज शेतकर्याना मोबाईलवर मिळतो बँकेत सतरा गावचे पाच हजाराच्या वर शेतकरी खाते आहेत त्यापैकी पाचशे ते सहाशे शेतकर्याना अतिवृष्टीचे अनूदान वाटप केले

राजेद्रकुमार म्हस्के शाखा व्यवस्थापक
जिल्हा मध्यवर्ति सहकारी बॅक तळणी

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले