प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत शालेय पोषण आहार मध्ये काम करणाऱ्या स्वयंपाकी व मदतनीस यांचे प्रशिक्षण संपन्न.
परतूर दि.13(प्रतिनिधी- कैलाश चव्हाण)
येथील गट शिक्षणअधिकारी कार्यालयात दि.12 रोजी तालुक्यातील सर्व शाळेत शालेय पोषण आहार चे काम करणाऱ्या स्वयंपाकी व मदतनीस म्हणून काम करणाऱ्या च प्रशिक्षण अनलिटिकल टेस्टिंग अँड रिसर्च लॅब जळगाव या संस्थे मार्फत पूर्ण करण्यात आले. -परतूर येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शालेय पोषण आहार च्या स्वयंपाकी व मदतनीस यांना मार्गदर्शन करण्यात आले.
शालेय पोषणातून होणारी विषबाधा रोखण्यासाठी कशी काळजी घ्यावी या बाबत वैशाली दुबे यांनी माहिती दिली. या कार्यक्रमाचे प्रमुख गट शिक्षण अधिकारी संतोष साबळे, शालेय पोषण आहार अधीक्षक बी.ए. गव्हाड सह सर्व कर्मचारी उपस्थित होते.