गुडमॉर्निंग पथकाने देशी विदेशी दारुची चोरटी वाहतूक करणाऱ्यांच्या आवळल्या मुसक्या , पहाटे पाच वाजेच्या सुमारास आष्टी पोलिसांची धडाकेबाज कारवाई,पिकअपसह तीनलाख ३६ हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त
आष्टी प्रतिनिधी कैलाश चव्हाण
तालुक्यातील आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंदे व देशी विदेशी दारूची विक्री व चोरटी वाहतुकीवर आष्टी पोलीसांच्या कारवाई सुरूच आहे. त्यातच दि ४ जून रोजी पहाटे पाच वाजता पोलिसांच्या गुडमॉर्निंग पथकाने अवैध देशी विदेशी दारूची चोरट्या मार्गाने वाहतूक करणारे पिकॶप भल्या पहाटे पाच वाजता पोलीसांनी पकडून कारवाई केली आहे. एका जणास ताब्यात घेत पिकॶप सह देशी विदेशी दारूचे बॉक्स असा 3 लाख 36900 रूपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.
रविवारी सकाळी पाच वाजेच्या सुमारास आष्टी पोलीस ठाण्याचे गुडमॉर्निंग पथक गस्तीवर असतांना पांडेपोखरी कडून सूरुमगाव पाटीकडे रस्त्याने पिकॶप क्रमांक एम एच 21 बी एच 5217 मधून देशी विदेशी दारुची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती पथकाला मिळाली. असता सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके यांच्यासह सदरील पथकाने पांडेपोखरी येथे पिकॶप ला थांबवून झडती घेतली असता त्यात 36 हजार 900 रूपयाची देशी विदेशी दारु आढळून आली. पोलिसांनी एका जणांसह पिकअप जप्त केले आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी विनोद वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सिध्दार्थ दादाराव खरात रा कुंभारी पिंपळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके, जमादार डी.आर. बरले, गणेश शिंदे, विनोद वाघमारे, आदींनी केली आहे. या कारवाईने अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्यांच्या धाबे दणाणले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके यांनी अवैध धंदे चालकांवर कारवाई करण्याची मोहीम उघडली असल्याने अवैध धंद्यावर दररोज कारवाया केल्या जात असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.