परतुर शहरातील तहसिल कार्यालय ते काँलेज रोड दुरूस्ती, पाडेवार यांच्या पाठपुरठयाला यशपरतुर (प्रतिनिधी,)जालना जिल्ह्यातील परतुर शहरातील मुख्य रस्ता असलेला तहसिल कार्यालय ते काँलेज रोड वरती मोठ मोठ खड्डे पडले होते या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांनी परतुर च्या उपविभाग आधिकारी यांना दिनांक १५ आँक्टोबर रोजी लेखी निवेदन देऊन हा रस्ता तात्काळ दुरूस्ती करण्या यावा असी मागणी केली होती, रस्त्यावर मोठ मोठे खडे पडले असुन अनेक वाहणे या खड्यात फसत असल्याचे निवेदनात नमूद केले होते , या निवेदनाची  तात्काळ उपविभागीय अधिकारी, यांनी दखल घेऊन नगरपालिकेला दिनांक १६ आँक्टोबर रोजी पञ देऊन हा रस्ता तात्काळ दुरूस्ती करण्या संदर्भात लेखी कळवले होते,तसेच पाडेवार यांनी  माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांना सुध्दा या रस्त्या संदर्भात माहिती दिली होती, लोनिकर यांनी पाडेवार यांच्या मागणीची तात्काळ दखल घेत नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना मोबाईलवर संपर्क करून हा रस्ता तात्काळ दुरूस्ती करून नविन पक्का रस्ता बनवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना केल्या, हा रस्ता तात्काळ दुरूस्ती करण्यात येईल अशे मुख्याधिकारी यांनी लोणीकर यांना सांगितले गुरुवारच्या मध्ये राञी मेघा ईजिनिंयरीगं कंपनीने हा रस्ता तात्पुरता सोरूपात खडी कच टाकुन दुरूस्ती केला आहे, मात्र हा रस्ता कायमस्वरूपी  सिमेंट काँक्रीटचा बनवावा अशी मागणी पाडेवार यांनी  केली आहे, रस्ता दुरूस्ती झाल्याबद्दल माजी मंञी तथा आमदार बबनराव लोणीकर, नगर अध्यक्ष विमलताई जेथलीया, उपविभागीय अधिकारी जाधव साहेब,मुख्याधिकारी गवळी साहेब, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आणि सर्व पञकार बंधूचे  सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांनी मनपूर्वक आभार मानले

Popular posts from this blog

हातडी शिवारात बिबट्याची भटकंती;शेतकर्‍यात भितीचे वातावरण,शोधमोहिम सुरू शेतकर्‍यांना काळजी घेण्याचे आवाहन

परतूर रेल्वेफाटक जवळ रेल्वेच्या धडकेने वृद्धासह म्हैस ठार

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि