Posts

Showing posts from January, 2025

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष पदी विजय यादव तर सचिव पदवी अतुल हजारे.

Image
परतूर प्रतीनिधी कैलाश चव्हाण परतुर येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती 2025 ची बैठक शासकीय विश्रामगृह प्रवीण डुकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी सर्वानुमते सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष पदी विजय यादव तर सचिव पदी अतुल हजारे, उपाध्यक्ष शुभम कटोरे, कोषाध्यक्ष संदीप शिंदे, सहकोषाध्यक्ष किशोर ठोंबरे, सहसचिव विठ्ठल सोनपावले, संघटक गोपी ठाकूर, यांची निवड करण्यात आली. तर सल्लागार समिती मध्ये बाबाजी गाडगे, शत्रुघ्न कणसे, विठ्ठलराव बरकुले, सुदर्शन सोळंके, अमोल सुरूग, प्रवीण सातोणकर, संतोष हिवाळे, शामसुंदर चितोडा, सचिन खरात, नामदेव गोरे, प्रवीण डुकरे यांची निवड केली.    याप्रसंगी बैठकीला मुरली सोनखेडकर, ऋषिकेश कराळे, सुनील गायकवाड, श्याम शिंदे, विष्णू मचाले, आदी शिवप्रेमी उपस्थित होते.

मुख्याध्यापक एल. के. बिरादार यांना मातृशोक

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण   दि. 30 - लालबहादूर शास्त्री विद्यालयाचे मुख्याध्यापक एल. के. बिरादार यांच्या मातोश्री मुद्रिकाबाई किशनराव बिरादार यांचे बुधवारी रात्री 11:50 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.  त्या 80 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,एक मुलगी,सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर जामखंडी ता. भालकी जि. बिदर या त्यांच्या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी समाजातील सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲड. सुरेश काळे यांना जाहीर झाला महाराष्ट्र गौरव सन्मान पुरस्कार

Image
परतुर प्रतिनिधी- कैलाश चव्हाण    परतुर वकील संघाचे सचिव ॲड.सुरेश काळे यांना सुप्रीम ह्युमन राईट इंटेलिजन्स इंडिया या संस्थेमार्फत महाराष्ट्र गौरव पुरस्कार मराठवाडा विभागातून घोषित झाला आहे.    अहो रात्र दिन, दुबळ्या ,वंचित ,शोषित ,पीडित आदिवासी समूहासाठी पोट तिडकीने व स्वतःला झोकून देऊन काम करणारे असे सर्वसामान्यतून उभा राहिलेले नेतृत्व ॲड.सुरेश काळे यांना नुकताच महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. या अनुषंगाने परतुर मंठा विधानसभेचे लाडके आमदार मा.बबनरावजी लोणीकर साहेब यांनी त्यांचा भ्रमणध्वनी द्वारे अभिनंदन केले तसेच विविध क्षेत्रातील लोकांनी व मित्रमंडळींनी त्यांना या पुरस्काराबद्दल खूप खूप शुभेच्छा दिल्या सर्वच स्तरातून या पुरस्काराची चर्चा केली जात आहे. येणाऱ्या 02 मार्च 2025 रोजी नाशिक येथे या पुरस्कार वितरणाचे कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे.

खा.डॉ.कल्याण काळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची अंतरावली सराटी येथे भेट घेतली.

Image
जालना प्रतीनीधी नरेश अन्ना मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले मा.मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अंतरवाली सराटी गावात जाऊन खा.काळे यांनी यावेळी उपस्थित आंदोलक व गावकऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. राज्य सरकार या प्रकरणात गंभीर्याने लक्ष्य घालवे व मार्ग काढावा. जरांगे पाटील सोबत बसलेले आंदोलक यांची तब्येत पण   खालवत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी यांनाही या ठिकाणी डॉक्टर ची टीम वाढवावी व ताबडतोब काळजी घ्या अशा सूचना खा.कल्याण काळे यांनी केल्या

जालना शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवून बाळासाहेबांना जयंतीनिमित्त अभिवादन !

Image
जालना, (प्रतिनिधी) नरेश अन्ना  दि. 23 हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्या हस्ते शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून शहरातील गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, वादविवाद स्पर्धा आदींचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उपजिल्हाप्रमुख बाबुराव पवार, माजी सभापती देवनाथ जाधव, शहर प्रमुख बाला परदेशी, घनश्याम खाकीवाले, दुर्गेश काठोटीवाले, माजी नगरसेवक जे.के. चव्हाण, गंगुताई वानखेडे, विजय पवार, मंजुषा घायाळ यांची उपस्थिती होती. विविध ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष संघटनेत ८० टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण हा मूलमंत्र घालून दिला. त्याप्रमाणे मुंबईसह राज्यात शिवसेनेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर, रुग्णवाहिका, गोरगरिबांना मदत, कोणतत्याही अडी-अडचणीच्या व संक...

आस लागली संसाराची मनी गं...रानात राबतोय कुणबीनीचा धनी गं...!कवी केशव खटिंग यांच्या काव्यगायनाने रसिक झाले मंत्रमुग्ध ! ll लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या स्नेहसंमेलनाचे थाटात उदघाट्न ll

Image
परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण   दि. 22 - येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उदघाट्न सुप्रसिद्ध कवी केशव खटिंग यांच्या हस्ते बुधवारी पार पडले.संस्थेच्या संचालिका श्रीमती वर्षाताई आकात या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या तर प्राचार्य डॉ. भारत खंदारे,मुख्याध्यापक एल. के. बिरादार यांची यावेळी यांची उपस्थिती होती.प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त प्राचार्य डॉ. भगवानराव दिरंगे,प्रा.सखाराम टकले,साहित्यिक छबुराव भांडवलकर,एकनाथ कदम,मुख्याध्यापिका गिरी मॅडम, शिलजा मॅडम, सुरेश बहाड, आर्दड यांची उपस्थिती होती.    कवी खटिंग यांनी यावेळी एकापेक्षा एक सरस कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.    झेंडा कोणाचा धरायचा नाही.... आस लागली संसाराची मनी गं... रानात राबतोय कुणबीणीचा धनी गं, लेक इतर कविता सादर त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. सर्व कविताना विद्यार्थ्यानी टाळ्याच्या कडकडाटात प्रचंड प्रतिसाद दिला. आपल्या कवितामधून त्यांनी ग्रामीण जीवन, कष्टकरी जनता, ग्रामीण बोलीभाषा, आजचे आणि पूर्वीचे जीवन यातील फरक आ...

संपादक ज्ञानेश्वर लंगे यांना मुकनायक पुरस्कार

  समाधान खरात (मराठवाडा प्रतिनिधी)  बीड वडवणी येथील प्रसिद्ध साप्ताहिक गदर चे संपादक ज्ञानेश्वर लंगे यांना माजलगाव येथील निर्भीड पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा मुकुनायक पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामुळे गदरचे संपादक ज्ञानेश्वर लंगे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. संपादक ज्ञानेश्वर लंगे यांनी अल्पावधीत गदर साप्तहिकाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना हात घालून आपल्या वर्तमानपत्रात आवाज उठवला. जनतेच्या मनामध्ये गदर साप्ताहिकाने अल्पावधीत नाव कमावल आहे. या साप्ताहिकाच्या कामाची दखल घेऊन माजलगाव येथील निर्भीड पत्रकार संघाने संपादक ज्ञानेश्वर लंगे यांना मुकुनायक पुरस्कार जाहीर केला आहे. पुढील महिन्यात मान्यवरांच्या हस्ते मुकनायक पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे अशी माहिती माजलगाव निर्भीड पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब आडागळे, परमेश्वर सोळंके, अमर साळवे, शेख हमीद, राजरत्न डोंगरे, सिद्धेश्वर गायकवाड, संतोष रासवे, विजय कापसे, अनिकेत भिलेगावकर, विजय डावरे, दिगंबर गिरी, ज्येष्ठ पत्रकार प्रदीप कुलकर्णी, मार्गदर्शक प्रचंड सोळंके ,मुंजा गाडेकर, बालासाहेब उफाडे रामभाऊ यादव, रंजीत आडागळे,...