Posts

Showing posts from February, 2025

केंद्रीय प्राथमिक शाळा आंबा येथे शिवजयंती साजरी

Image
परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण . प्राथमिक शाळा आंबा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रम घेऊन साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  दत्तराव घुले तर प्रमुख अतिथी म्हणून  पंचायत समिती माजी सदस्य  कृष्णा भदर्गे  विलासराव डोईफोडे पोलीस पाटील  काळदाते  दादाराव बोंनगे मुख्याध्यापक  सी बी पतंगराव हे होते अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक मुख्याध्यापक  सी बी पतंगराव यांनी केले विद्यार्थ्यांनी पोवाडा ,गीत आणि भाषण मध्ये सहभाग नोंदविला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  दिलीप मगर श्री नारायण राऊत  दिनेश लाचुरे सलीम कायमखानी  भगवानराव शेरे  बाबुराव पारदेवाड आदींनी परिश्रम घेतले

जगेल तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी क्रांतिगुरू लाहुजींची प्रखर देशभक्ती तरुणांना प्रेरणादायी देणारी-दगडुबा घोडे यांचे प्रतिपादन

Image
परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण लहुजींचे वडील क्रांतिकारी राघोजी साळवे इंग्रजां विरुद्धच्या लढाईमध्ये धारातीर्थी पडले.त्याप्रसंगी देशभक्त क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांनी इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाची सुटका व्हावी या प्रेरणेतून जगेल तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी अशी भीष्मप्रतिज्ञा घेतली.  क्रांतिगुरू लाहुजी वस्ताद साळवे यांची प्रखर देशभक्ती तरुणांना प्रेरणादायी देणारी आहे  असे प्रतिपादन समाजसेवक दगडुबा घोडे यांनी केले.परतूर येथील रेल्वे स्टेशन समोरील मुख्य मध्य मार्गावरील लहुजी चौकात क्रांतिगुरू लाहुजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले याप्रसंगी विलासराव, लोखंडे, प्रकाश लोंढे, सुंदर  हिवाळे,विजय वाणी  यांची उपस्थित होती पुढे बोलतांना दगडुबा घोडे  म्हंणले की, लहुजींच्या आखाड्यात व्यायामाचे धडे घेण्यासाठी व शरीर बळकट करण्यासाठी ज्योतिबा फुले,लोकमान्य टिळक,वासुदेव बळवंत फडके, विठ्ठल वाळवेकर, नाना मोरोजी, नाना छत्रे ,उमाजी नाईक सखाराम परांजपे, सदाशिव बल्लाळ,गोवंडे गुरुजी आदींनी प्रशिक्षण घेतले लहुजींच्या या शिष्...

उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या परतूरात, जेथलिया करणार राष्ट्रवादीत प्रवेश

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण   राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार शनिवारी परतूरच्या दौऱ्यावर येत आहेत. माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.    राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे,मा. रुपालीताई चाकणकर,मा.ना. दत्तामामा भरणे, मा.ना.इंद्रनील नाईक,युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील नगर परिषद स्टेडियम परिसरात शनिवारी सकाळी १० वाजता अजित पवारांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे मराठवाड्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, आमदार उपस्थित राहणार आहेत. नगर परिषद स्टेडियमवर भव्य शामियाना उभारण्यात आला आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया परतूर, मंठा आणि नेर, सेवली परिसरातील आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधणार आहेत.जास्तीत जास्त पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या सभेला उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंद चव्हाण, सुरेशकुमार जेथ...

कलावंत घडविण्यात शाळेच्या रंगमंचाची भूमिका मोठी पोलीस निरीक्षक मच्छिन्द्र सुरवसे शास्त्री विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात

Image
परतूर, प्रतिनिधी कैलाश चव्हाण   दि. 8 - शाळेच्या सांस्कृतिक मंचावर सुप्त कलागुणांना वेळीच वाव मिळाल्याने मराठी रंगभूमी तसेच चित्रपट सृष्टीला अनेक नामवंत कलावंत लाभले आहेत.  त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनाप्रसंगी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर भाग घ्यावा असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक मच्छिन्द्र सुरवसे यांनी केले.    शहरातील मोंढा विभागातील छत्रपती शिवाजीनगरमधील लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी द्रोपदाबाई आकात इंग्लिश स्कुलच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिलजा के.सीबी होत्या. तर यावेळी माजी उपनगराध्यक्ष विजय राखे,सनील सर,गटसमन्वयक कल्याण बागल, अंकुश शिंदे, सुरेश बहाड यांचीही प्रमुख उपस्थिती होती.   सुरवसे पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या अंगी अनेक सुप्त कलागुण असतात. वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून हे कलागुण प्रदर्शित करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळत असते.या संधीचा लाभ विद्यार्थ्यांनी निश्चितच घेतला पाहिजे असे सांगतानाच सुरवसे पुढे म्हणाले...

परतूर येथे त्यागमूर्ती माता रमाईची जयंती उत्साहात केली साजरी

Image
परतूर/प्रतिनिधी कैलाश चव्हाण  दि.७ फेब्रुवारी रोजी परतूर येथे बहुजनांची आई त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची १२७ वी जयंती प्रचंड उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली. जयंती निमित्त ठीक सकाळी ठीक १० वाजता तहसील कार्यालयाच्या समोर पुतळ्याच्या नियोजित जागेवर वंचित बहुजन आघाडीचे नेते रामप्रसाद थोरात व सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले.त्या नंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.नंतर जयंती समितीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला ,त्यानंतर बोधाचार्य हेमंत पहाडे यांनी उपस्थित बौद्ध उपासक उपासिका व आंबेडकरी अनुयायांना बुद्ध वंदना देऊन कार्यक्रमाची सुरुवात केली, नंतर उपस्थित मान्यवरांचे जनसमुदायाला मार्गदर्शन मिळाले, या वेळी प्रमुख अतिथी म्हणून शहाजी राक्षे, शिवाजी पाईकराव, रमेश पाईकराव, अँड.महेंद्रकुमार वेडेकर, इज्रान भाई कुरेशी, ढवळे साहेब, उपस्थित होते.              यावेळी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्...

शास्त्री विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

Image
परतूर -प्रतीनीधी कैलाश चव्हाण  येथील छत्रपती शिवाजीनगरमधील लालबहादूर शास्त्री विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना गुरुवारी (दि. 6) भावपूर्ण निरोप देण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ शिक्षक हरिओम कोरके हे होते.     तर प्रमुख पाहुणे म्हणून त्र्यंबक घुगे,रामराव पवार, किरण गवई, पंडितराव निर्वळ,आसाराम धुमाळ,दत्तात्रय आकात,मधुकर वखरे, अरुणकुमार वावरे इतरांची उपस्थिती होती.      यावेळी समृद्धी गाडगे, आदिती कंठाळे, आरुषी ठोके, पांडुरंग बिल्हारे, वैष्णवी मुजमुले आदी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. तर अरुणकुमार वावरे, मधुकर वखरे, आसाराम धुमाळ यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी ढोबळे यांनी केले.    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा धुमाळ, संस्कृती धुमाळ यांनी संयुक्तपणे केले. कार्यक्रमाला विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

विवेकानंद इंग्लिश स्कूल ,परतूर मध्ये रथसप्तमी निमित्त सूर्यनमस्कार प्रशिक्षण उत्साहात संपन्न!

Image
परतूर प्रतीनिधी कैलाश चव्हाण रथसप्तमीच्या निमित्ताने सूर्यनमस्काराचे महत्त्व अनन्यसाधारण असून, निरोगी आरोग्य व सकारात्मक ऊर्जेसाठी सूर्यनमस्कार महत्त्वाचे मानले जाते. विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य व आनंद वाढावा, या उद्देशाने विवेकानंद शाळेच्या वतीने विशेष सूर्यनमस्कार प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणासाठी योगतज्ञ राधा तांबे व गजानन वायाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी विद्यार्थ्यांनी १२ सूर्यनमस्कारांचे शास्त्रीय पद्धतीने प्रशिक्षण घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनानंतर शाळेचे अध्यक्ष संदीप बाहेकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योग, ध्यान व प्राणायाम महत्त्वाचे आहेत. शाळेत अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन केले जाते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भालचंद्र महाजन सर, विजय धंदाळे सर व शिक्षकवृंदांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सकारात्मक ऊर्जा हा कार्यक्रमाचा मुख्य गाभा ठरला!

परतूरच्या शास्त्री विद्यालयात स्वयंशासन दिन साजरा

परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण     येथील छत्रपती शिवाजीनगर भागातील लालबहादूर शास्त्री विद्यालयात सोमवारी स्वयंशासन दिन (स्कुल डे) उत्साहात साजरा करण्यात आला.   या दिवशी शाळेचे सर्व कामकाज दहावीच्या विद्यार्थ्यांनी हाताळले. रोहित बळीराम राठोड या विद्यार्थ्याने मुख्याध्यापकाची जबाबदारी पार पाडली.    दहावीच्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक,शिक्षक,लिपिक, सेवक या पदाची एक दिवशीय भूमिका पार पाडली.अर्थात शालेय कामकाजाचा अनुभव घेतला.    एकूण पाच तासिका घेण्यात आल्या. त्यानंतर समारोप झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी शिकवत असताना आलेले अनुभव विषद केले.विद्यार्थ्यांना दहावीचे वर्गशिक्षक रामराव पवार, हरिओम कोरके, किरण गवई व बळीराम राठोड यांनी मार्गदर्शन केले.    यावेळी पर्यवेक्षक राजकुमार राऊत यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समृद्धी गाडगे व आदिती कंठाळे यांनी संयुक्तपणे केले.यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.