Posts

Showing posts from June, 2025

न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरु पौर्णिमेच्या कार्यक्रम संपन्न

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा  न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज परतुर मध्ये गुरुपौर्णिमा निमित्त "जीवनातील गुरुचे महत्व" या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतला तसेच इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा या मंत्रावर शास्त्रीय पद्धतीने नृत्य सादर करून गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली.  नृत्य दरम्यान इयत्ता दहावीची विद्यार्थिनी संस्कृती संतोष झरेकर हिने जीवनातील गुरुचे महत्व सांगून शाळेतील सर्व शिक्षक वृंदाचे आभार मानले. या कार्यक्रमा दरम्यान संस्थेचे अध्यक्ष  नारायण  सोळंके ,संस्थेच्या सचिव छाया बागल तसेच व्हॉइस प्रिन्सिपल पूजा मोरे, शिक्षकवृंद व  शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

नूतन गटशिक्षणाधिकारी अशोक सोळंके यांचा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने सत्कार

Image
परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण परतुर तालुक्यात नव्याने रुजू झालेले गटशिक्षणाधिकारी श्री अशोकराव सोळंके यांचा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी कार्यालयीन अधीक्षक श्री शेख सत्तार  केंद्रीय मुख्याध्यापक श्री प्रल्हादराव माने,कार्यालयीन अधीक्षक  सत्तार,तालुकाध्यक्ष दिलीप अण्णा मगर, ज्येष्ठ शिक्षक  एन डी राऊत कार्यालयीन कर्मचारी  अमोल जी मगरे व इतर मान्यवरांची उपस्थिती होती. पर्यावरण दिनानिमित्त साहेबांना वृक्षारोपणासाठी भेट देण्यात आली

बाबुराव मामा सतकर यांचे निधन

जालना ( प्रतिनिधी) नरेश अन्ना    ज्येष्ठ समाजसेवक, दलित मित्र बाबुराव मामा सतकर ( 78) यांचे शुक्रवारी ( ता. 06) पहाटे दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार असून रामतीर्थ स्मशानभूमीत दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मागील अनेक वर्षांपासून ते गवळी समाजासह इतरही अनेक सामाजासाठी कार्यरत होते. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य शासनाने त्यांना दलीत मित्र हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.  सामाजिक कार्या बरोबरच अध्यात्मिक क्षेत्रातही त्यांचा मोठा हातभार होता तसेच त्यांना कुस्त्यांची आवड असल्याने जालना शहर आणि जिल्ह्यातील अनेक कुस्तीपटू मल्ल त्यांनी घडविले होते.  याप्रसंगी खा. डॉ. कल्याण काळे, आ.अर्जुनराव खोतकर ,माजी आ.कैलास गोरंट्याल, नितीन जेथलिया, इकबाल पाशा, महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे प्रदेश सचिव प्रवीण हुंडीवाले,सुनील पै. खरे, ॲड. ब्रम्हानंद चव्हाण, राजेंद्र राख,अंकुशराव राऊत, भाऊसाहेब घुगे, नारायण दादा चाळगे, गजानन गीते, सुदामराव सदाशिवे, व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनीत सा...