लोकसेवा नशामुक्ती केंद्राचे थाटात उद्घाटन , लोकसेवा व्यसनमुक्ती प्रबोधन केंद्र तरुणांना दिशावह .-वेदांताचार्य सिध्दलिंग शिवाचार्य महाराज
साखरखेर्डा प्रतिनिधी - राधेश्याम बंगाळे माणूस हा सवयीचा गुलाल आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात देशाच्या उज्वल भवितव्याची इमारत उभारणारा युवक व्यसनाधीन झाला असून अशा व्यसनी माणसाला प्रेमाची आणि सुरक्षिततेची आत्यंतिक गरज असते. त्याची त्याच्या जीवनमूल्यांवरची श्रद्धा आणि विश्वास दृढ झाला पाहिजे. त्याच्या कुटुंबियांनी त्याला समजावून घेतलं पाहिजे कारण त्याला अशा काळात कुटुंबाच्या मदतीची जास्त गरज असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला तो जिथे आहे, त्या वातावरणात मोकळं वाटलं पाहिजे. राधेश्याम बंगाळे पाटील यांचा समाजसेवी उपक्रम तरुणांना नशामूक्तिच्या वाटेवर घेऊन जाणार आहे जिल्हातील व्यसनाधीन झालेल्यांना त्यांना त्यातून सुटका करण्याचा वीडा उचलला आहे. लोकसेवा आयुर्वेदिक केंद्रा च्या माध्यमांतून लोकांना आधार बनवून भरकटत चाललेल्या व्यसनाधीन पिढीला प्रबोधनाच्या माध्यमातून दिलासा मिळेल असे प्रतिपादन जगद्गुरू पलसिध्द महास्वामी पिठाचे मठाधिपती वेदान्ताचार्य शिवाचार्यरत्न सिध्दलिंग शिवाचार्य महाराज यांनी व्यक्त केले. ते काल सा...