Posts

Showing posts from December, 2024

पाटोदा [ माव ] श्री समर्थ माध्यमिक विद्यालयात वीरबाल दिनानिमीत्त निमीत्त चित्रप्रदर्शनी चे आयोजन.

Image
परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण     वीरबालक बाबा जोरावारसिंह जी व बाबा फतेहसिंह जी यांच्या संपुर्ण जीवनावर आधारीत रंगीत छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजीत करण्यात आले होते. सव्वीस डिसेंबर हा दिवस संपुर्ण देशात विरबालदिन म्हणुन साजरा केल्या जातो. आपृल्या मातृभुमीप्रती - धर्माप्रती  प्राणत्याग करनारे कोवळ्या वयातील बालकांचे हे बलिदान चिरकाल प्रेरणा देणारे आहे असे प्रतीपादन केंद्र गट साधन केंद्र समन्वयक  कल्याण बागल यांनी  केले. नुकतेच जाहीर झालेल्या मुख्यमंत्री माझि शाळा - सुंदर शाळा या स्पर्धेत परतुर तालुक्यातील संस्था गटातुन श्री समर्थ माध्यमिक विद्यालयास तृतीय पारितोषीक मिळाल्याबद्दल विद्यालयाचे कौतुक व अभिनंदन श्री कल्याण बागल सरांनी केले. शाळेत सातत्याने विवीध ऊपक्रम व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याबद्दल केंद्र प्रमुख श्री शंकरराव थोटे सरांनी शाळेचे कौतुक केले. मुख्याध्यापक सुरेश पाटोदकर यांच्या संकल्पनेतुन व संकलनातुन सदरील रंगीत छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजीत करण्यात आले होते.  धनबा सर व विद्यालयाचे सर्व कर्मचारी या वेळी ऊपस्थीत होते.

'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' स्पर्धेत शांतिनिकेतनचे यश

Image
जालना प्रतीनीध नरेश अन्ना  जालना शहरातील संभाजीनगर भागातील शांतिनिकेतन विद्यामंदिर  या शाळेने मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन मध्ये तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक मिळविला शासनाच्या वतीने सन 2024-25 मध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना अंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा हे अभियान सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांकरिता राबविण्यात आले. या अभियानात शहरातील संभाजीनगर येथील शांतीनिकेतन विद्यामंदिर शाळेने भास्करराव अंबेकर यांच्या मार्गदर्शनात खाजगी व्यवस्थापन प्रकारात जालना तालुक्यातून द्वीत्तीय क्रमांक पटकावला. शाळेच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष भास्करराव अंबेकर यांनी शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.  यावेळी महिंद्र देशपांडे, माजी सभापती देवनाथ जाधव, हरिहर शिंदे, डॉ.माधव अंबेकर, बाला परदेशी, दीपक रणवरे, नर्सिंगच्या प्राचार्य लियांता निर्मल आदींची यावेळी उपस्थिती होती. या अभियानात पायाभूत सुविधा, शासन ध्येय धोरण यांची अंमलबजावणी व शैक्षणिक संपादमुख या तीन प्रमुख निकषावर आधारित मूल्यमापन करण्यात आ...

न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चा संघ विभागीय आट्या पाट्या स्पर्धेसाठी रवाना.

Image
परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण  शालेय शिक्षण व क्रीडा विभाग , क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद जालना यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित जिल्हास्तरीय आट्या पाट्या स्पर्धेत न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज  या विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकविला त्यांना या  स्पर्धेचे कोच म्हणून  विनायक बोरकर यांनी मार्गदर्शन केले तर  कॅप्टन रविन्द्र खरात, रवीराज गोलांडे, हनुमान सोळंके, विश्वजीत बेरगूडे यांच्या सह  विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकवून  शाळेचे नावलौकिक केले  या नंतर शाळेतील विध्याार्थी विभागीय स्पर्धेत उत्तम कामगिरी करतील असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष  गणेश सोळंके , मुख्याध्यापक  शाम सर क्रिडा शिक्षक  विजय सर यांनी  व्यक्त केला  या सह  शिक्षक वृंदानी पुढील स्पर्धेसाठी विध्यार्थ्याना  शुभेच्छा दिल्या.

भिम उद्योग अभियानच्या जिल्हा महिला समन्वयक पदी सौ शारदा ताई गवई यांची निवड

जालना प्रतिनिधी समाधान खरात    भिम उद्योग अभियान जालना  जिल्हा समन्वयकाची बैठक  संस्थापक अध्यक्ष संजय भालेराव यांच्या अध्यक्षते खाली नागसेन ग्रंथालय अंबड रोड जालना येथे  संपन्न झाली,  राजेश ओ राऊत,{ राज्य महासचिव }डॉ सुरेंद्र खाडे{ राज्य उपाध्यक्ष} मा महेंद्र रत्नपारखे {मराठवाडा विभागीय अध्यक्ष} आदींनी उद्योग व्यवसाय संदर्भात  आपले सखोल मनोगत व्यक्त केले  सदर बैठकीमध्ये औद्योगिक विकास महामंडळ यांनी भिम उद्योग अभियान च्या( अनुसूचित जाती जमातीच्या ) उत्पादन उद्योगासाठी जालना शहराच्या PIII मध्ये प्लॉट वाटप करण्याची मागणी करण्यात येऊन,अनुसूचित जाती जमातीच्या नवउद्योजकांनी  भारतरत्न डॉ  बाबासाहेब आंबेडकर इन्व्हेस्टमेंट फंड योजनेचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचे आवाहन  भालेराव यांनी केले     या बैठकीमध्ये भिम उद्योग अभियानच्या जिल्हा महिला  समन्वयक पदी सौ शारदा ताई गवई यांची निवड करण्यात आली नवीन वर्षात 1 जानेवारी 2025 रोजी भिम उद्योग अभियान वतीने नागसेन ग्रंथालय अंबड रोड जालना येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल...