शिवसेनेच्या संघटनात्मक बैठकांना प्रचंड प्रतिसाद, निवडणुका असो अथवा नसो पक्ष संघटन अत्यंत महत्वाचे - अंबादास दानवे
जालना, प्रतिनिधी नरेश अन्ना - दि.३0 पक्ष संघटन हे निवडणुका असो अथवा इतर कोणतेही कार्य असो, यासाठी अत्यंत महत्वाचे असते. पक्ष संघटन मजबुत असेल तर आपण सर्व निवडणुका अत्यंत चांगल्या प्रकारे जिंकू शकतो, या करिता सर्वच पदाधिकार्यांनी आपआपल्या क्षेत्रात पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी प्रयत्न करावेत. पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी व नागरिकांना आपला पक्ष सदैव उपयोगी ठरणारा असला पाहिजे. त्यांच्या सुख-दुःखात पदाधिकारी उभा असला पाहिजे तसेच आपल्या क्षेत्रातील नागरिकांच्या अत्यंत छोट्या-छोट्या कामी त्याची मदत केली पाहिजे, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले. जालना शहरातील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकार्यांच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर,उपनेते लक्ष्मणराव वडले,उपजिल्हाप्रमुख मुरलीधर शेजुळ,माजी सभापती मुरलीधर थेटे, बाबुराव पवार,तालुकाप्रमुख हरिहर शिंदे, शहरप्रमुख बाला परदेशी, दुर्गेश ...