लालबहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालयाची निकालाची परंपरा कायम .
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेमध्ये लालबहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालय यशाची परंपरा कायम राखत तीनही शाखेच्या विदयार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले . विज्ञान शाखेचा 94.66 टक्के, वाणिज्य 90.32 टक्के तर कला शाखेचा 69 टक्के निकाल लागला आहे . कला शाखेतून शेख फैजान इरफान 74.33 टक्के गुण मिळवून कला शाखेतून सर्वप्रथम. शेख मोहम्मद सिराज मोहम्मद 73.67 टक्के मिळवून द्वितीय तर उगले कृष्णा भगवान 72.83 टक्के मिळवून तृतीय. वाणिज्य शाखेतून कु. गवळी आकांक्षा सदाशीव 80.33 टक्के गुण मिळवून प्रथम तर जिया फिरदोस अब्दुल नईम 77.50 टक्के गुण मिळवून द्वितीय आणि महेश कैलाशराव ढवळे व कोमल बाबासाहेब काकडे 77 टक्के गुण मिळवून तृतीय . विज्ञान शाखेतून कु. आंधळे वैष्णवी गोविंद 83.33 टक्के गुण मिळवून सर्वप्रथम तर कु. माठे इषा विठ्ठलराव 82.50 टक्के मिळवून द्वितीय तर कु. जाधव प्रियंका विनायक 81.67 टक्के गुण मिळवून तृती...