दलित महासंघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी विजय जाधव यांची नियुक्ती
जालना | प्रतिनिधी समाधान खरात दलित महासंघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते विजय दिगंबरराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दलित महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी नियुक्तीपत्र देऊन ही नियुक्ती जाहीर केली. नियुक्तीपत्रानुसार, विजय जाधव यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दलित, वंचित, पीडित व अन्यायग्रस्त समाजघटकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या विचारांनुसार कार्य करावे, अशी अपेक्षा संस्थापक-अध्यक्षांनी व्यक्त केली आहे. दलित महासंघ ही महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांनी प्रेरित सामाजिक संघटना असून, समाजातील दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी कार्यरत आहे. यावेळी विजय जाधव यांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीसाठी प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी शुभेच्छा देत त्यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन केले.
Comments
Post a Comment