परतूर -मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा अधिवेशनात मांडा,.आ.सुरेश जेथलिया यांचे विरोधी पक्ष नेते मा.वीजय वडेट्टीवर यांना साकडेजालना प्रतिनिधी समाधान खरात
   जिल्हात दिनांक २६ ते २८ नोव्हेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे फळबागा आणि शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
 ही पाहणी करण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते मा.श्री.विजयजी वडेट्टीवार हे आज जालना जिल्हा दौऱ्यावर आले होते.
 तसेच परतूर व मंठा तालुक्यात देखील अवकाळी पाऊसाने कापूस, तूर, ज्वारी, गहू या पिकांचे अतोनात नुकसान झालेले असून देखील परतूर -मंठा तालुके शासनाने अवकाळी पाऊस नुकसानग्रस्त तालुक्यातुन वगळले असून त्या तालुक्यांचा देखील सहभाग करण्यात यावा या संदर्भात आपण अधिवेशनात आवाज उठवावा या संदर्भात विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना मा. आ. सुरेश जेथलिया यांनी निवेदन देत मतदारसंघातील शेतकऱ्यांना न्यान देण्याची विनंती केली. तसेच विरोधी पक्ष नेत्यांनी प्रतिसाद देत जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले.

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले