कानडीतील अखंड हरिनाम सप्ताहात भक्तिरसाची उधळण,देव देश आणि धर्मासाठी जगणे काळाची गरज,पच्चावन्नाव्या वर्षीही परंपरा अखंड; ह.भ.प. तुकाराम महाराज पारधी यांची कीर्तनसेवा
तळणी प्रतिनिधी रवी पाटील तळणीपासून जवळ असलेल्या कानडी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी भक्तिरसाचा महासागर उसळला. यंदा या सप्ताहाचे पच्चावन्नावे वर्ष असून श्री कानिफनाथ मंदिर परिसरात शिवमहापुराण गाथा, हरिभजन व सायंकाळी कीर्तन असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दुसऱ्या दिवशी ह.भ.प. तुकाराम महाराज पारधी यांच्या ओजस्वी वाणीतील कीर्तनसेवा संपन्न झाली. “ जग झोडी, जग जोडी, नाव ठेविले लाडी” या संत एकनाथ महाराज यांच्या अभंगावर आधारित निरूपण करत त्यांनी उपस्थित भाविकांना भक्ती, सदाचार आणि नामस्मरणाचा गूढ अर्थ समजावून सांगितला. “घरी बसून करा नामस्मरण; गंगा तुमच्यापर्यंत येईल” कीर्तनादरम्यान महाराजांनी सांगितले की, “तुमच्या अंतःकरणातील पाप नष्ट व्हावे, द्वेषभाव नाहीसा व्हावा, यासाठी शरणागती आवश्यक आहे.” काही भाविकांनी “आमच्याकडे तीर्थयात्रेला जाण्यासाठी पैसा नाही, साथ नाही” अशी व्यथा मांडली असता त्यांनी अत्यंत सोप्या शब्दांत मार्ग दाखवला— “ तीर्थावर जाता येत नसेल तर घरीच बसा; पण मुखाने ‘गंगा गंगा’ म्हणा. नामस्मरणानेच तीर्थाचे प...