Posts

Showing posts from March, 2026

सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा

Image
 परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा  दिनांक 09 जानेवारी 2026 सोमवार रोजी न्यू वंडर किड्स इंग्लीश स्कूल अँड ज्यू. कॉलेज, परतूर येथे महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या महिला दिनाचे उत्सवाचे उद्घाटन नगराध्यक्षा प्रियंकाताई रक्षे यांच्या हस्ते करण्यात आले सर्व प्रथम जिजामाता भोसले, रमाबाई आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व फित कापून करण्यात आले. याप्रसंगी संस्था मार्गदर्शक पार्वतीबाई सोळंके, सचिव छाया बागल, प्रमुख पाहुणे उपनगराध्यक्षा विशाखा राखे, उपमुख्याध्यापिका पुजा मोरे उपस्थित होते. यावेळी महिलांनी स्वतःच्या आरोग्याचे संरक्षण कसे करावे याचे उत्तम मार्गदर्शन मीरा झरेकर यांनी केले तद्नंतर नीलिमा मसलकर पाल्याच्या संस्काराविषयी भाष्य केले. तसेच  घरकाम सांभाळून नोकरी व व्यवसाय करणाऱ्या कर्तबगार महिलांचा संस्थे तर्फे विशेष सत्कार करण्यात आला. याकार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून नगरसेविका स्नेहा अग्रवाल, नगरसेविका कल्पना डहाळे, संजीवनी खालापूरे, रेवती राखे उपस्थित होते.      संस्था अध्यक्ष नारायण दादा सोळंके, मु...

पुण्य परोपकार, पाप ते परपीडा” संतविचारांचा जागर, कीर्तनातून समाजमनाला स्पर्शसंतविचारांचा दीप पुन्हा प्रज्वलित संदीप महाराज खंडागळे यांचा कानडी येथे हितोपदेश

Image
तळणी प्रतिनिधी रवी पाटील  *“पुण्य परोपकार, पाप ते परपीडा”* या अमर अभंगातून मानवतेचा सोपा पण अत्यंत प्रभावी जीवनमंत्र देणारे संत तुकाराम महाराज यांचे विचार आजही समाजमनाला तितक्याच ताकदीने जागृत करतात. स्थानिक कीर्तन सोहळ्यात या अभंगावर करण्यात आलेल्या ओजस्वी निरूपणाने उपस्थित भाविक अक्षरशः भारावून गेले. कीर्तनकार **संदीप महाराज खंडागळे** यांनी संतवाणीचा गाभा उलगडताना स्पष्ट शब्दांत सांगितले – **“परोपकारासारखे पुण्य नाही आणि परपीडेसारखे पाप नाही.”** देवपूजा, वारी, भजन यांपुरते धर्माचे आचरण मर्यादित नसून, दुसऱ्याच्या अडचणीत धावून जाणे, संकटात मदतीचा हात देणे, सत्तेचा सदुपयोग करणे आणि प्रामाणिकपणे जगणे — हाच खरा धर्म असल्याचा ठाम संदेश त्यांनी दिला.  अभंगातून जीवनाचा आरसा   पुण्य परोपकार पाप ते परपीडा । आणिक नाही जोडा दुजा यासी ॥ *सत्य तोचि धर्म असत्य ते कर्म । आणिक हे वर्म नाही दुजे ॥ या ओळींचे प्रभावी निरूपण करताना त्यांनी सांगितले की, दुसऱ्याच्या कल्याणाची भावना ज्या मनात असते, तेथेच खरे पुण्य साठते. एखाद्याचे वाईट व्हावे, त्याचे नुकसान व्हावे अशी इच्छा ठेवणे —...

तुकाराम बीजे निमित्त कानडी येथे ह.भ.प. अर्जुन महाराज बादाड यांची प्रभावी कीर्तन सेवा; संत तुकाराम महाराजांच्या चरित्रातून भक्ती, समर्पण आणि पुरुषार्थाचा संदेश

Image
 तळणी प्रतिनिधी रवी पाटील संतश्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या तुकाराम बीजे निमित्त कानडी येथे भाविकांच्या उपस्थितीत ह.भ.प. अर्जुन महाराज बादाड यांची अत्यंत भावस्पर्शी व विचारप्रवर्तक कीर्तन सेवा संपन्न झाली. या कीर्तनातून संत तुकाराम महाराजांचे चरित्र, त्यांचे निस्वार्थ भक्तिमार्ग, तसेच समाजाला दिलेला अध्यात्मिक संदेश यांचे प्रभावी विवेचन करण्यात आले. कीर्तनाच्या प्रारंभी महाराजांनी संत परंपरेचा उल्लेख करत सांगितले की, महाराष्ट्र ही संतांची भूमी असून या भूमीला संतांच्या त्याग, समर्पण आणि भक्तीमुळे पावित्र्य लाभले आहे. संत ज्ञानेश्वरांनी अल्पवयातच ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ निर्माण केला, तर संत तुकाराम महाराजांनी अभंगांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत अध्यात्माचा मार्ग पोहोचवला. देहू नगरीत भजन-कीर्तनाच्या माध्यमातून तुकाराम महाराजांनी विठ्ठलभक्तीचा प्रचार सुरू केला. कोणतेही पत्रक, जाहिरात किंवा प्रसिद्धी न करता केवळ कीर्तन आणि अभंगांच्या सामर्थ्याने त्यांचा संदेश खेड्यापाड्यांत पोहोचू लागला. त्यांच्या वाणीतील साधेपणा, भक्तीतील प्रामाणिकपणा आणि समाजजागृत...

कानडीतील अखंड हरिनाम सप्ताहात भक्तिरसाची उधळण,देव देश आणि धर्मासाठी जगणे काळाची गरज,पच्चावन्नाव्या वर्षीही परंपरा अखंड; ह.भ.प. तुकाराम महाराज पारधी यांची कीर्तनसेवा

Image
तळणी प्रतिनिधी रवी पाटील  तळणीपासून जवळ असलेल्या कानडी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी भक्तिरसाचा महासागर उसळला. यंदा या सप्ताहाचे पच्चावन्नावे वर्ष असून श्री कानिफनाथ मंदिर परिसरात शिवमहापुराण गाथा, हरिभजन व सायंकाळी कीर्तन असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दुसऱ्या दिवशी ह.भ.प. तुकाराम महाराज पारधी यांच्या ओजस्वी वाणीतील कीर्तनसेवा संपन्न झाली. “ जग झोडी, जग जोडी, नाव ठेविले लाडी” या संत एकनाथ महाराज यांच्या अभंगावर आधारित निरूपण करत त्यांनी उपस्थित भाविकांना भक्ती, सदाचार आणि नामस्मरणाचा गूढ अर्थ समजावून सांगितला. “घरी बसून करा नामस्मरण; गंगा तुमच्यापर्यंत येईल” कीर्तनादरम्यान महाराजांनी सांगितले की, “तुमच्या अंतःकरणातील पाप नष्ट व्हावे, द्वेषभाव नाहीसा व्हावा, यासाठी शरणागती आवश्यक आहे.” काही भाविकांनी “आमच्याकडे तीर्थयात्रेला जाण्यासाठी पैसा नाही, साथ नाही” अशी व्यथा मांडली असता त्यांनी अत्यंत सोप्या शब्दांत मार्ग दाखवला—  “ तीर्थावर जाता येत नसेल तर घरीच बसा; पण मुखाने ‘गंगा गंगा’ म्हणा. नामस्मरणानेच तीर्थाचे प...