पोलीस ठाण्याच्या आवारातच पोलीसांची पत्रकाराला धमकी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार; पत्रकार संरक्षण कायद्याबाबत ठाण्याचे पोलीस अधिकारी अनभिज्ञ!
जालना प्रतिनिधी - समाधान खरात/नरेश अन्ना पोलीस ठाण्याच्या आवारातच एका पत्रकाराला बुधवार (दि 2) रोजी सुनील भारती, विलास गायकवाड, गणेश सातपुते तिघे पत्रकार उभ्या असताना त्यांच्या समोर धमकी दिल्याची तक्रार तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे संबंधीत पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांनाच पत्रकार संरक्षण कायद्याबाबत माहिती नसल्याचे दिसून आले असून याबाबत वरिष्ठांना तक्रार पाठवून त्यांच्याकडून याबाबत पत्रकार संरक्षण कायद्याबाबत माहिती घेऊन गुन्हा दाखल करण्यात येईल असे आश्वासन ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री उनवणे यांनी पत्रकारांच्या शिष्टमंडळाला दिले आहे. या संदर्भात दिलेल्या तक्रारीत जलजला टाईमचे संपादक आमेर खान याकुब खान याने म्हटले आहे की, त्यांच्या वृत्तपत्रात दि 31 मार्च 2025 रोजी बातमी लावल्याचा राग मनात धरून पोलीस कर्मचारी चंद्रकांत माळी यांनी जालना तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात सुनील भारती, विलास गायकवाड, गणेश सातपुते त्यांना समोर बुधवार (दि 2) रोजी धमकी देत चेतावले आहे. श्री माळी म्हणाले की, खेटायचे असेल तर मी पूर्णपणे आता खेटतोच व तुला बघु...