अहिल्याबाई होळकर उत्सव समितीची बैठक संपन्न...

परतूर प्रतिनिधी/ हनुमंत दंवडे राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त उत्सव समितीची परतूर विश्रामगृहात बैठक घेण्यात आली या बैठकीत अहिल्याबाई होळकर उत्सव समिती परतुर अध्यक्षपदी नामदेव गोरे, उपाध्यक्षपदी दत्ता कोल्हे ,तर सचिव पदी हनुमंत दवंडे यांची निवड करण्यात आली.अहिल्याबाई होळकर जयंतीच्या नियोजनासंदर्भात विविध विषयावर चर्चा करण्यात आली या बैठकीत राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर जयंती सर्व धर्मीय व सर्वपक्षीय घेण्याचे निश्चित करण्यात आले. सर्व समाज बांधवांना जयंती उत्सव कार्यकारणी मध्ये सामाविष्ट करून घेऊन जयंती उत्सव बहुजन प्रबोधनपर कार्यक्रम घेण्याचे ठरले आहे. राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्ताने 31 मे रोजी समाज बांधव अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी चौंडी येथे जात असतात त्यामुळे परतूर येथे 3 जून रोजी कार्यक्रम घेण्यात येणार आहे .भव्य दिव्य अशी मिरवणूक परतूर रेल्वे गेट ते परतूर तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे. व शेवटी समारोप सुद्धा तहसील कार्यालयासमोर होईल या बैठकीला उपस्थित म्हणून. संयोजक कमिटी . हारेराम माने , शिवाजीराव