भारतातील सर्वात स्वस्त पाणीपुरवठा करणारी योजना, 1 पैशात 1 लिटर तर 12 रुपयात 1 हजार लिटर पाणी मिळणारा देशातील एकमेव प्रकल्प-माजी मंत्री आ.लोणिकर



परतूर, मंठा व जालना तालुक्यातील 176 गावे व मंठा तालुक्यातील स्वतंत्र 95 गावांच्या दोन ग्रीड पाणी पुरवठा योजना ह्या महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाकांक्षी योजना असून तिन्ही तालुक्यातील 110 गावात शुद्ध पाणीपुरवठा आज तारखेला सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून तीन तालुक्यांना पिण्याचा शुद्ध पाणीपुरवठा होणार आहे. 1 पैशात 1 लिटर तर 12 रुपयात 1000 लिटर शुद्ध पाणी मिळणार आहे. या दोन्ही योजनेसाठी एकूण 400 कोटी रु. खर्च केले जाणार आहेत. भारतातील सर्वात स्वस्त पाणी पुरवठा करणारी योजना असणार आहे अनेक ठिकाणी ग्रीडचे काम पूर्ण झाले असून छोट्या मोठे कामे करणे प्रलंबित आहेत. ही कामे तात्काळ पूर्ण करून पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करावी अशा सूचना माजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी आज दिल्या.

औरंगाबाद येथे आयोजित मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या कार्यालयात आयोजित बैठकीत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर बोलत होते यावेळी मुख्य अभियंता लोलापोड, अधीक्षक अभियंता अजयसिंह, मनोज पांगारकर, ॲड. वीरेंद्र देशमुख, कार्यकारी अभियंता गजानन रबडे, कंत्राटदार श्री घुले, उपअभियंता पाथरवाड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती यावेळी वांजोळा पुनर्वसन उद्भव, मुख्य पाईप लाईन, जलकुंभ, गावातील वितरण व्यवस्था, सौर ऊर्जा प्रकल्प इत्यादी बाबत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सविस्तर चर्चा करून काम तात्काळ पूर्ण करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

176 गाव व 95 गाव ग्रीड पाणीपुरवठा योजना ह्या अत्यंत महत्वाकांक्षी असणाऱ्या परतूर मंठा व जालना तालुक्यातील गावांना शुद्ध पाणीपुरवठा देणाऱ्या योजना आहेत. 95 गावांची ग्रीड पाणीपुरवठा योजना खडकपूर्णा जलाशय नावावरून तयार करण्यात आली होती परंतु बुलढाणा जिल्ह्यातील धरणग्रस्त, लगत येणाऱ्या गावांच्या ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी विरोध दर्शविल्यानंतर सदर काम खडकपूर्णा ऐवजी वांजोळा (ता.मंठा) या निम्न दुधना प्रकल्पातील जलाशय अनुभवावरून सुधारित योजनेअंतर्गत करण्यात आला. त्या नवीन 95 गाव ग्रीड पाणी पुरवठा योजनेला जून 2019 मध्ये तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने मंजुरी दिली आहे ही योजना अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असून तात्काळ कार्यवाही पूर्ण करण्याबाबतच्या सूचना यावेळी लोणीकर यांनी उपस्थित कंत्राटदार व अधिकारी यांना दिल्या.

प्रत्येक गावास त्यांच्या लोकसंख्येनुसार दरडोई 40 लिटर प्रमाणे जलकुंभ पर्यंत शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असून जलकुंभ पासून गावातील वितरण व्यवस्थेपर्यंत वैयक्तिक नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची व देखभाल दुरुस्ती करण्याची तसेच पाणीपट्टी वसूल करण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायत व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने संयुक्तपणे घेण्याची गरज आहे त्यासाठी संबंधित ग्रामपंचायत आणि त्या त्या गावातील प्रत्येक कुटुंबापर्यंत जनजागृती करणे आवश्यक असल्याचे लोणीकर यांनी बैठकीदरम्यान स्पष्ट केले आहे.

मूळ योजनेत पंपिंग मशिनरी साठी लागणारी वीज बचत व्हावी यासाठी 1.12 मेगावॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर करण्यात आलेला असून त्यामुळे कमी प्रमाणात वीज बिल मिळणार आहे खडकपूर्णा धरण उद्भव रद्द झाल्यामुळे निम्न दुधना प्रकल्पातील वांजोळा पुनर्वसन या ठिकाणाहून 95 गाव वॉटर ग्रीड योजनेतील गावांना पाणीपुरवठा केला जाणार आहे या योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेले मुख्य जलकुंभ संतुलित जलकुंभ मुख्य पाईपलाईन गावागावातील पाण्याच्या टाक्या गावांतर्गत वितरण व्यवस्था पाणीपट्टी वसुली यासह सर्वच बाबतीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व्यक्तिशः लक्ष देण्याची गरज असून लवकरात लवकर कामकाज पूर्ण करण्याबाबत च्या सूचना लोणीकर यांनी यावेळी बैठकीदरम्यान दिल्या.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती