पशू वैद्यकिय वीभागाच्या सतर्कते मुळे125 जनावारांचे प्राण वाचले

परतूर दि.23(प्रतीनिधी) पशु वैद्यकीय विभागाच्या सातर्कते मुळे वाचले 125 च्या वर जनावरांचे प्राण.
    परतूर तालुक्यातील नांद्रा या गावात अचानक  सायंकाळी पाच वाजल्या  च्या सुमारास  जनावरांनी काही खाल्याने जनावरे दगवण्यास सुरवात झाली होती. या दरम्यान गावातील 3 ते 4 जनावरे दगावली गेली याची माहिती या गणाचे पंचायत समिती सदस्या वंदनाताई दिगंबर मुझमुळे यांनी पशु वैद्यकीय तालुका अधिकारी डॉ रमाकांत ढवळे यांना दूरध्वनी द्वारे काळवताच अवघ्या काही तासात  डॉ प्रशांत रोहनकर,डॉ. जाधव, कर्मचारी गोरे यांना घेत तात्काळ नांद्रा या गावी दाखल होत. गावातील सर्व जनावरांची पाहणी करत उपचार चालू केला या मुळे जवळपास 125 जनावरांचे प्राण वाचले या बद्दल सर्व ग्रामस्थांनी सर्व पशु विभागाचे आभार मानले. या वेळी माझी सरपंच तथा पं.स.सदस्य दिगंबर मुजमुले, प्रभू ताठे, मदन मुजमुले, दीपक मुजमुले, गजानन मुजमुले,रंगनाथ हिवाळे, कोंडीभाऊ तांगडे, विष्णू मुजमुले, सुनील आखाडे,सुभाष आखाडे .राजेभाऊ भेंडाळकर,मोहन पारे, शिवाजी भेंडाळकर, विठ्ठल आखाडे, विष्णू मुजमुले, मनोहर मुजमुले आदिनी मदत केली

Comments

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत