परतूर येथे महाराजा अग्रसेन यांची जयंती साधेपणाने साजरी -

-परतूर/प्रतिनिधी - 
           येथील नवा मोंढा बालाजी मंदिरात शनिवारी (दि.१७) कोरोना महामारीमुळे महाराजा अग्रसेन यांची ५१४६ वी जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली.सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी गणेशलाल मोहनलाल अग्रवाल (बाबूलतारावाले) यांच्या हस्ते सपत्निक अग्रसेन महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि ध्वजारोहण करण्यात आले.नंतर अग्रसेन महाराजांची आरती करण्यात आली.यावर्षी कोरोनामुळे जयंती मिरवणूक व अन्य सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले होते.शनिवारी मंदिरात झालेले कार्यक्रम कोरोनाचे सर्व नियम पाळून घेण्यात आले.या जयंती कार्यक्रमास अग्रवाल सेवा समितीचे सर्व पदाधिकारी व अग्रवाल समाज बांधवांची उपस्थिती होती.

Popular posts from this blog

हातडी शिवारात बिबट्याची भटकंती;शेतकर्‍यात भितीचे वातावरण,शोधमोहिम सुरू शेतकर्‍यांना काळजी घेण्याचे आवाहन

परतूर रेल्वेफाटक जवळ रेल्वेच्या धडकेने वृद्धासह म्हैस ठार

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि