शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार- माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांना मदत न केल्यास विधानसभा आणि विधान परिषदेचे कामकाज चालू देणार नाही- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर


मंठा(प्रतिनिधी)
महाराष्ट्रातील सरकार शेतकऱ्यांच्या नावावर सत्तेवर आलं परंतु सत्तेवर आल्यानंतर मात्र सरकारला शेतकऱ्यांसह सर्वच बाबींचा विसर पडला असून आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर आहोत जोपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळत नाही तोपर्यंत मी प्रयत्न करत राहील आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईल असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केले

मंठा तालुक्यातील कर्नावळ, रानमळा याठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस बोलत होते यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर माजी मंत्री पंकजाताई मुंडे माजी मंत्री आमदार संभाजी निलंगेकर भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश प्रभारी संजय कोडगे भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस राहुल भैया लोणीकर युवा मोर्चा सचिव प्रेरणा होनराव यांची प्रमुख उपस्थिती होती

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की सरकारला सत्तेत आल्यानंतर आपण स्वतः दिलेल्या शब्दांची तरी किमान आठवण राहणे अपेक्षित होते परंतु आज या शब्दाला सुद्धा सरकार जागत नाही हे अत्यंत दुर्दैवी असून जोपर्यंत सरकार मदत करत नाही तोपर्यंत आपण प्रयत्नशील राहणार असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे फडणवीस म्हणाले

कोरडवाहू शेतकऱ्यांना तात्काळ 25 हजाराची तर बागायतदार शेतकऱ्यांना पन्नास हजाराची मदत करा अशी मागणी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली होती तर शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयाची मदत करा अशी मागणी विद्यमान उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी केली होती काळजीवाहू मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी फडणवीस यांनी माननीय राज्यपाल मार्फत 10 हजार कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना केली होती. त्यावेळेस ही मदत अत्यंत तुटपुंजी आहे यापेक्षा अधिक मदत करणे अपेक्षित आहे असेही अजित दादा पवार यांनी सांगितले होते परंतु प्रत्यक्षात आता माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री पदावर अजितदादा पवार आहेत आज मात्र योग्य वेळी शेतकऱ्यांना योग्य मदत करू अशा प्रकारची भाषा सरकार बोलत आहे सरकारची योग्य वेळ येणार तरी कधी असाही संदिग्ध प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आज आहे अशा शब्दात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सरकारला प्रतिप्रश्न केला आणि सरकार मदत करणार नसेल तर अधिवेशन कशासाठी घ्यायचे असा सवाल देखील लोणीकर यांनी यावेळी केला जोपर्यंत शेतकऱ्यांना मदत जाहीर होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर आपण लढा उभा करत राहू व मदत न मिळाल्यास माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वात विधानसभा आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर विधान परिषदेचे कामकाज चालू देणार नाही असा इशारा लोणीकर यांनी यावेळी दिला

संपूर्ण मराठवाड्यामध्ये 90 टक्केपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले असून मराठवाड्यात पिकांचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे असे असताना देखील इंग्रजांच्या काळातील नजर आणेवारी नुसार 55 टक्के पेक्षा अधिक आणेवारी दाखवून राज्य सरकारला दुष्काळ जाहीर करायचाच नाही की काय असा प्रश्न पडू लागला आहे परंतु येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये मराठवाड्याच्या ओल्या दुष्काळाबाबत सरकारला नक्की जाब विचारू, प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे शिलेदार चालू देणार नाहीत अशा शब्दात माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले

==============
उडीद मूग बाजरी ज्वारी कापूस सोयाबीन कोणतं पीक हाती लागलं असून सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर आला आहे दमडीची मदत करायला सरकार तयार नाही शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे एकतर बोगस बियाणं सरकारने दिलं त्याचा उपयोग झाला नाही आता निसर्गानं सगळं हिरावून घेतलं आम्ही जावं कुणाकडे दाद मागावी कुणाला *फडणवीस साहेब तुम्ही मुख्यमंत्री असते तर आम्हाला नक्कीच मदत मिळाली असती अशा शब्दात स्थानिक शेतकरी अंकुश गोबरा चव्हाण यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.*
==============
यावेळी भाजपा मंठा तालुका अध्यक्ष सतीशराव निर्वळ, परतुर तालुका अध्यक्ष रमेश भापकर, जालना तालुका अध्यक्ष प्रकाश टकले, घनसावंगी तालुका अध्यक्ष संजय तौर, जिल्हा उपाध्यक्ष गणेश राव खवणे सभापती संदीप भैय्या गोरे रंगनाथ येवले उपसभापती राजेश मोरे उपसभापती नागेश घारे रामप्रसाद थोरात भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सर्जेराव जाधव जि प सदस्य पंजाबराव बोराडे विलास आकात शिवदास हनवते सुदाम प्रधान हरिराम माने ज्ञानेश्वर शेजुळ ह भ प रमेश महाराज वाघ गजानन देशमुख दारासिंग चव्हाण विठ्ठलराव काळे विलास घोडके प स सदस्य दत्‍तराव कांगणे नाथराव काकडे दिगंबर मुजमुले दिलीप पवार महिला जिल्हाध्यक्ष जिजाबाई जाधव कालींदाबाई डोके चंद्रभागा काळे सरपंच कैलास चव्हाण अशोकराव बुरकुले युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुजित जोगस सरचिटणीस  शिवराज नारियल वाले तालुका अध्यक्ष अविनाश राठोड शत्रुघ्न कणसे विक्रम उफाड योगेश ढोणे जिल्हा उपाध्यक्ष गजानन उफाड विकास पालवे गोविंद ढेंबरे नितीन सरकटे रोहन आकात महेश पवार गणेशराव चव्हाळ यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती