धर्माबाद ते मनमाड एक्स्प्रेस शनिवारी सकाळपासून धावणार..


परभणी, दि. 22 (प्रतिनिधी) ः काचिगुडा ते मनमाड या रेल्वेमार्गावर शनिवारपासून (दि.24) धर्माबाद - मनमाड - धर्माबाद ही विशेष एक्स्प्रेस धावणार आहे.
दरम्यान, यापूर्वी याच वेळेत मराठवाडा एक्स्प्रेस धावत होती. त्याच वेळेत विशेष रेल्वे म्हणून ही रेल्वे धावणार आहे.
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वे विभागाने नांदे़ड ते पनवेल या एक्स्प्रेस पाठोपाठ मराठवाड्यातील रेल्वेप्रवाशांच्या सोयीकरिता धर्माबाद ते मनमाड व मनमाड ते धर्माबाद ही विशेष रेल्वे शनिवारपासून सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ही रेल्वे धर्माबादहून सकाळी चार वाजता निघणार आहे. नांदेड स्थानकावर पाच वाजून 28 मिनिटांनी, पूर्णेत सहा वाजून तीन मिनिटांनी, परभणीत सहा वाजून 38 मिनिटे, मानवतरोड सहा वाजून 57 मिनिटे, सेलूत सात वाजून 17 मिनिटे, परतूर सात वाजून 44 मिनिटे, रांजनी सात वाजून 54 मिनिटे, जालना आठ वाजून 28 मिनिटे, बदनापूर आठ वाजून 49 मिनिटे, मुकूंदवाडी 9 वाजून 29 मिनिटे, औरंगाबाद येथे दहा वाजून पाच मिनिटांनी, लासूर येथे दहा वाजून 41 मिनिटे, करंजगाव दहा वाजून 54 मिनिटे, रोटेगाव 11 वाजून 19 मिनिटे, अंकई 12 वाजून 52 मिनिटे व मनमाड रेल्वे स्थानकावर एक वाजून 20 मिनिटांनी पोचेल.
मनमाड येथून दुपारी तीन वाजता परतीच्या प्रवासास निघेल. अंकई येथे दुपारी तीन वाजून 13 मिनिटे, रोटेगाव तीन वाजून 49 मिनिटे, करजगाव चार वाजून नऊ मिनिटे, लासूर चारवाजून 19 मिनिटे, औरंगाबाद येथे पाच वाजून 50 मिनिटांनी, मुकूंदवाडी सहावाजून 11 मिनिटे, बदनापूर सहा वाजून 36 मिनिटे, जालना सहा वाजून 50 मिनिटे, रांजनगाव सात वाजून 14 मिनिटे, परतूर सात वाजून 29 मिनिटे, सेलू सात वाजून 51 मिनिटे, मानवतरोड आठ वाजून चार मिनिटे, परभणी आठ वाजून 43 मिनिटे, पूर्णा येथे नऊ वाजून 33 मिनिटांना, नांदेड येथे दहा वाजून आठ मिनिटे, उमरी 11 वाजून एक मिनिटे व धर्माबाद येथे रात्री 12 वाजून दहा मिनिटांनी ही एक्प्रेस पोचेल.

Popular posts from this blog

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथे 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा

नेर येथील कौशल्याबाई लाहोटी यांचे नेत्रदान