मतदारसंघाचा कायापालट करणे ही आमची जबाबदारी,मतदार संघातील जनतेने आपल्याला भरभरून प्रेम दिले - प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर


परतूर (प्रतिनिधी) गेल्या पाच सहा वर्षांमध्ये परतूर मतदार संघाचा माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकास झाला असल्याचे प्रतिपादन भाजयुमोचे प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर यांनी केले  
      ते परतूर तालुक्यातील कोकाटे हादगाव ,कोकाटे हदगाव तांडा, व हातडी तालुका परतुर येथे युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण व उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते
      पुढे बोलताना राहुल लोणीकर म्हणाले की आपल्यावर भारतीय जनता युवा मोर्चा ने राज्याची जिम्मेदारी टाकली असून आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विविध माध्यमातून जनतेची सेवा करणार असल्याचे ते म्हणाले.
 मतदारसंघातील जनतेने आपल्याला भरभरून दिले असून आपण मतदार संघाचे पांग फेडल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास त्यांनी या वेळी बोलून दाखवला 
विकासाच्या कामांमध्ये आणि समाजाच्या हिताच्या आड येणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या विरोधात आपण ठाम असल्याचे सांगत येथील युवा व सर्व स्तरातील नागरिक माझे कुटुंब असून माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची काळजी घेण्याचे काम या पुढे ही आपण सुरू ठेवणार असल्याचे ते म्हणाले 
मतदारसंघातील जनतेचे आपल्यावर ऋण असून ते ऋण फेडण्यासाठी आपण कधी मागे हटणार नसल्याचे ते म्हणाले
    मी समाजकारणाच्या माध्यमातून 2001 साली राजकारणात प्रवेश केला तेव्हा पासून आपण दिलेल्या भरभरून प्रेमा मुळे मी आज इथपर्यंत पोहचलो असल्याचे ते म्हणाले
   या वेळी कोकाटे हदगाव येथे  आरो फिल्टर चे लोकार्पण तसेच कोकाटे हदगाव ते लिंबी रस्त्याचे उद्घाटन त्याचबरोबर देवीच्या मंदिरासमोर पेवर ब्लॉक बसवण्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले तर कोकाटे हदगाव तांडा येथे  सेवालाल महाराज सामाजिक सभागृहाचे बांधकामा चे भूमिपूजन यावेळी करण्यात आले तर हातडी तालुका परतुर येथे आरो फिल्टर चे लोकार्पण यावेळी राहुल लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले
  यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष रमेश भापकर, पंचायत समिती सभापती रंगनाथ येवले, जिल्हा परिषद सदस्य सुदामराव प्रधान, कृषी उत्पन्न बाजार समिती आष्टी चे सभापती सिद्धेश्वर सोळंके, पंचायत समिती सदस्य प्रदीप ढवळे ,पंचायत समिती सदस्य शिवाजी पाईकराव , युवा मोर्चा तालुका अध्यक्ष  शत्रुघ्न  कणसे, गजानन लोणीकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संपतराव टकले तालुका सरचिटणीस रवी सोळंके, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष अविनाश राठोड अमोल पवार, ज्ञानेश्वर सोळंके अण्णासाहेब ढवळे, बालासाहेब पोटे भीमराव राठोड, श्री गांजाळे ,गंगाधर ढवळे, रमेशराव आढाव ,ओम प्रकाश बोरकर, दत्ता फटिंग, मदनराव गोरे, मुंजा झरेकर, गंगाधर बोरकर ,प्रल्हाद बोरकर, दादासाहेब बोरकर ,रमेश राव बोरकर ,गणेश बोरकर, तुकाराम बोरकर, यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती