संपादकास धमकाविल्याचा निषेध ,पत्रकार संघटनांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांना निवेदन
जालना ।(प्रतिनिधी) येथील संपादकास बुधवारी (दि 18) दिवसभरात विविध फोन नंबरवरून अर्वाच्च भाषेत बोलून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आमदार लोणीकर यांच्या समर्थकांकडून देण्यात आल्या. या घटनेचा जालना जिल्ह्यातील पत्रकार संघटनांनी निषेध नोंदवत जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दैनिक युवा आदर्शचे संपादक दीपक शेळके यांंनी आमदार बबनराव लोणीकर संदर्भात प्रकाशित केलेल्या वृत्तात आक्षेपार्ह असे काही नाही. योग्य त्या शब्दांचा वापर करून बातमी दिली आहे. दि 18 नोव्हेबर सकाळी आठ वाजल्यापासून दिपक शेळके यांना फोनवर जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहे. याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात रितसर तक्रार करण्यात आली आहे. धमकावणे आणि अवार्च्च भाषेत बोलण्याचा जिल्ह्यातील पत्रकार आणि संपादक यांनी निषेध केला असून शेळके यांना व त्यांच्या परिवारास पोलीस संरक्षण देण्यासह आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी ही निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनावर असोसिएशन ऑफ स्मॉल अॅण्ड मिडीयम न्युजपेपर्स ऑफ इंडियाचे जालना जिल्हाध्यक्ष विकास बागडी, प्रेस क्लब ऑफ जालनाचे जिल्हाध्यक्ष भरत मानकर, दै. औरंगाबाद टाईम्सचे लियाकत अली खान, दै. मराठवाडा साथीचे अशोक मिश्रा, दै. पल्लवरंगचे अमित कुलकर्णी, दै. तरुण भारतचे महेश बुलगे, दै. मराठवाडा केसरीचे अच्युत मोरे, दै. गोकुळनितीचे अर्पण गोयल, दै. जगमित्रचे संतोष भुतेकर, दै. बदलता महाराष्ट्रचे कैलास गजर, दैनिक लोकआनंदचे भगवान निकम, सा. मुखमोर्चाचे दिनेश नंद, रवि जैस्वाल आदींची नावे आहेत.
Comments
Post a Comment