महावीतरणचा प्रताप अधिकृत विज जोडणी नसताना सुध्दा आले बिल


तळणी (रवि पाटील ) सध्या सपूर्ण राज्यात लाँकडाऊन काळातील वाढीव विज बिला सदर्भात आंकडतांडव सुरु असतानाच ग्रामीण भागातील नांगरीकांनी सुध्दा या वाढीव बिलाचा मोठा आर्थीक भुर्दंड बसला असुन महावीतरणच्या अनेक अक्षम्य चुका समोर येतानाचे नित्याचे झाले आहे ज्या गावामध्ये हजारो आकडे असत तेच गाव आज नियमित बिलाचा भरणा करत आहे शेकडो ग्रांहकांनी अधिकृत विज जोडणी करून सुध्दा घेतली पंरतू ज्या ग्राहकाने विज वितरण कडे विज जोडणीची साधी मागणी केली नाही की कुठली कागदपञ सुध्दा दिली नाही घरात मिटर सुध्दा नाही तरि सुध्दा पत्नीच्या नावाने चक्क बिल आल्याचा प्रकार तळणी येथे घडला असुन याकडे महावीतरण फक्त वेळ काढू पणाचे धोरण अंवल बित्त असल्याने याचा नाहक ञास नागरीकाना होत आहे विशेष बाब म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावाने  बिल आले आहे त्या  नावाने कुठलीच  स्थावर प्राँपट्री . नाही तरि सुध्दा हा प्रकार समोर आला आहे आणखी एक विषेश गोष्ठ म्हणजे ज्या ग्राहकांने कधी विज बिलाचा भरणा केलाच नाही तरि सुध्दा त्या बिलावर सहाशे दहा रुपये भरल्याची नोद आहे 

ज्या ग्राहकाकडे हे बिल आले त्यांने त्या नावाचे आणखी कोणी आहे का यांची शंहानीशा दोन दिवस नांतेवाईकाकडे केली पंरतू त्या नावाचे कुठलेच विज ग्राहक आढळून आले नाही

विशेष बाब म्हणजे गेल्या चार महीन्यापासुन गावामध्ये एबी केबल टाकल्या मुळे विज चोरीला बऱ्यापैकी आळा बसला असुन बस स्टॅन्ड व वंसत नगर मध्ये एबी केबल बसविणे बाकी आहे गावामध्ये एबी केबल टाकल्यापासुन महावीतरणची जुनी वसुली सुध्दा मोठया प्रमाणात झाली व नव्याने अधिकृत जोडण्या सुध्दा मोठया प्रमाणात नागरीकांनी करून घेतल्याने विज चोरी व रोहीञाचे जळण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी वाढीव बिल व विजेचा कमी दाब व अवेळी विज जाणे यामुळे नागरी ञ स्त असुन महावीतरणचे याकडे साफ दुर्लक्ष आहे . विशेष बाब म्हणजे गावाला महिला लाईन मन असल्याने जास्त अडचण येत असुन त्याना खाजगी माणसाला हाताशी धरूनच काम करून घ्यावी लागतात तळणी सारख्या मोठया गावात कायमस्वरूपी लाईनमन  पाहीजे असुन तो निवासी थांबणे गरजेचे आहे याबाबत सुध्दा नागरीकांनी वेळोवेळी महावीतरणच्या कनिष्ठ अभियंत्या कडे पाठपुरावा करून सुध्दा याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले 

महावीतरणच्या या अजब गजब कारभाराची चर्चा सध्या गावात जोरात आहे प्रत्येक जण बिले चेक करत असुन विज कंपनीच्या या मनमानी मुळे माञ सर्वसामान्य माणसाला ञास होत आहे हे नक्की 

गेल्या चार महिन्यापासुन लाईनमन कडे  जोडणी करुन देण्यासाठी   मागणी करत आहे सांगीतलेली सर्व कागदपत्र मी वडीलाच्या नावाने  तयार केली पण गेल्या दोन महीन्यापासुन ती कागदपञ मी विज वितरण कंपनी ला दिली नाही तारी  सुध्दा माझ्या पत्नीच्या . नावाने बिल आले असल्याचे 
गजानन सरकटे यांनी सांगीतले 

या बाबत कनिष्ठ अभियंत्ता यांना विचारले असता सबंधाताची तक्रार आली असुन मी तपासणी करून सांगतो असल्याचे महावी तरणचे ए एस जंगम यानी सागीतले

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती