अयोध्येतील भव्य राममंदिर लोकवर्गणीतून उभे राहणार - सावता काळे

 ---- परतूर/प्रतिनिधी - अयोध्येतील भव्य राममंदिर लोकवर्गणीतून उभे राहणार असल्याची माहिती श्री राम जन्मभूमि मंदिर निर्माण निधी संग्रह समर्पण समिती चे परतूर तालुका प्रमुख सावता काळे यांनी दिली.मंगळवारी ( दि.१५ ) शहरातील नवा मोंढा भागात श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माणच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी रा.स्व.संघाचे तालुका संघचालक शिवाजी पवार,ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष अंभुरे,सोपान जगताप,अशोक मसलकर उपस्थित होते.यावेळी मंदिर निर्माण अभियानाबद्दल अधिक माहिती देताना काळे म्हणाले की,परतूर तालुक्यातील ३ उपखंड,११ मंडलातून १११ गावातील समस्त हिंदू कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींपर्यंत या मंदिर निर्माणाबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे.ऐतिहासिक अशा राममंदिर जन्मभूमीचा इतिहास युवा पिढीपर्यंत पोहचावा यासाठी तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांचे व आध्यात्मिक संस्थांचे कार्यकर्ते घराघरांत पोहचणार आहेत.या अभियानात प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग असावा म्हणून १० रुपयांपासून ज्याच्या मनाला येईल ती रक्कम स्विकारली जाणार असून यामध्ये पारदर्शकता राहावी म्हणून निधी देणाऱ्या व्यक्तीला कुपन किंवा पावती देण्यात येईल.तसेच रामजन्मभूमी तिर्थ क्षेत्राचे संकल्पचित्र देण्यात येईल.हे अभियान दि.१५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण भारत भरात राबविण्यात येणार असून तालुक्यातील कार्यकर्ते त्यांच्या परिसरात स्वेच्छानिधी स्विकारणार आहेत.या अभियानाच्या पहिल्या दिवशी दि.१५ जानेवारी रोजी परतूर तालुक्यातील गावागावात श्रीराम मंदिर निर्माण भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.श्रीराम मंदिर निर्माणाच्या या अभियानात मोठ्या संख्येने समस्त हिंदू बांधवानी सहभाग घेऊन श्रीराम मंदिर निर्माणासाठी योगदान देण्याचे आवाहन श्री राम जन्मभूमि मंदिर निर्माण निधी संग्रह समर्पण समिती कार्यालय परतुर जिल्हा जालना च्या वतीने करण्यात आले आहे.यावेळी अभियानाचे जालना जिल्हा सहप्रमुख अशोक कादे,नामदेव महाराज शास्त्री,आकाश महाराज गायकवाड,रामेश्वर महाराज नरवडे,ज्ञानेश्वर भोसले,गोविंद मोर,आनंद बगडीया,प्रकाश दिक्षित,प्रमोद मसलकर,श्रीकिशन अग्रवाल,शिवकुमार सोळंके,मनिष अग्रवाल उपस्थित होते.

Popular posts from this blog

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथे 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा

नेर येथील कौशल्याबाई लाहोटी यांचे नेत्रदान