परतूर तहसील कार्यालयात लोणीकर यांनी घेतली विकास कामांची आढावा बैठक



परतूर(प्रतिनिधी)
मागील काळात प्रचंड मेहनतीने विविध विकास कामांसाठी भरघोस असा निधी आपण खेचून आणला असून केवळ कामचुकार अधिकाऱ्यांच्या व बेजबाबदार कंत्राटदारांच्या चुकांमुळे ही विकास कामे पूर्ण होऊ शकली नाहीत अद्याप देखील अनेक विकास कामे प्रलंबित आहेत वेळेत विकास काम पूर्ण न होणे तसेच अनेक विकासकामांना मुदतवाढ देऊन सुद्धा त्यात कोणत्याही प्रकारची प्रगती आढळून न येणे यासारख्या अत्यंत निष्काळजी आणि बेजबाबदार कामचुकार अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवा तसेच कामात हलगर्जीपणा करत वेळेत काम पूर्ण करणाऱ्या कंत्राटदाराला निलंबन सह काळया यादीत टाकण्याबाबत प्रसंगी गुन्हे दाखल करण्याबाबत कारवाई करा अशा कडक शब्दात कामचुकार अधिकाऱ्यांना लोणीकर यांनी धारेवर धरलं

परतूर येथे तहसील कार्यालयात आयोजित मंठा परतुर तालुक्यातील विविध विकास कामांची आढावा बैठक माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी भाजपा परतुर तालुका अध्यक्ष रमेश भापकर, मंठा भाजपा तालुकाध्यक्ष सतीशराव निर्वळ, परतूर तहसीलदार रूपा चित्रक, मंठा तहसीलदार सुमन मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अर्चना भोसले, भाजपा जालना जिल्हा उपाध्यक्ष गणेशराव खवणे, पंचायत समिती सभापती रंगनाथ येवले, बिडी पवार, उपसभापती रामप्रसाद थोरात, नागेश घारे, जिल्हा परिषद सदस्य पंजाब बोराडे, सुदाम प्रधान, पंचायत समिती सदस्य दिगंबर मुजमुले, शिवाजी पाईकराव यांची प्रमुख उपस्थिती होती.

परतूर तहसील कार्यालयात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारची रूर्बन योजना, वॉटर ग्रीड योजना व या योजनेअंतर्गत 176 गावांच्या पाणीपुरवठा यांचा कामांचा आढावा , मंठा परतूर व जालना तालुक्यातील रस्त्यांचे डांबरीकरण, शेगाव ते पंढरपूर रस्त्यावरील संपादित जमिनीचा मावेजा, परतूर येथील उड्डाणपुलाचे बांधकाम, गोदावरी ते पूर्णा या नद्यांसह ग्रामीण भागातील विविध ठिकाणी असणारे पुलांच्या कामाचा आढावा, मंठा व परतुर येथील क्रीडा संकुलाच्या कामाचा आढावा, परतूर येथील नाट्यगृह, अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय, तालुका कोर्टाचे सुशोभीकरण, मंठा व परतूर तालुक्यातील मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृह कामाचा आढावा, इलेक्ट्रिकल एअरकूल टेंडर चा आढावा, पर्यटन व तीर्थक्षेत्र विकास कामे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत विविध शेती उपयोगी कामे, किसान क्रेडिट कार्ड, शेतकऱ्यांना विविध बँकांचे कर्ज वाटप, मंठा व परतूर तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातील बुडीत क्षेत्रातील रस्ते, शेतकर्‍यांच्या पाण्याखाली गेलेल्या जमिनीची व पिकांची नुकसान भरपाई या आणि अशा एक ना अनेक कामांबाबत कोट्यावधी रुपयांचा निधी पडून असताना केवळ अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे व कंत्राटदाराच्या बेजाबदारपणामुळे तो खर्च होऊ शकलेला नाही त्या विकासकामांचा आढावा आज घेण्यात आला. कोट्यवधी रुपयांची विकासकामे मंजूर असताना किंवा या बेजबाबदारपणामुळे हलगर्जीपणामुळे सर्वसामान्य जनतेला त्याचा त्रास सहन करावा लागतो आहे अशा कंत्राटदारांची आणि अधिकाऱ्यांची कदापि गय केली जाणार नाही अशा स्पष्ट शब्दात लोणीकर यांनी बैठकीदरम्यान खडसावले व बेजबाबदार अधिकाऱ्यांचा निलंबनाचा किंवा त्याबाबत कोणती कायदेशीर कारवाई करता येईल त्याबाबतचा प्रस्ताव तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांकडेपाठवण्याची सूचना यावेळी लोणीकर यांनी केली कंत्राटदार वेळेत काम पूर्ण करत नसेल तर त्याला दंड आकारण्यात यावा व त्यानंतरही तो काम सुरळीतपणे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यास तयार नसेल तर अशा कंत्राटदारांना काळया यादीत टाकण्यास संदर्भातला प्रस्ताव पाठवावा अशा स्पष्ट सूचना लोणीकर यांनी यावेळी दिल्या.

*आमदार निधीतून देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण*
माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या आमदार निधीतून परतुर येथील ग्रामीण रुग्णालयासाठी सुसज्ज अशी रुग्णवाहिका देण्यात आली असून या रुग्णवाहिकेचे लोकार्पण आज लोणीकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले अत्यवस्थ रुग्णांची सोय व्हावी व कोविड काळात रुग्णांची सोय व्हावी यासाठी रुग्णवाहिका देण्यात आली असून या रुग्णवाहिकामुळे सर्वसामान्य नागरिकांना सुविधा उपलब्ध होणार असून सर्व सामान्यांच्या सुरक्षेसाठी आपण सदैव तत्पर असल्याचे देखील लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले

*नैसर्गिक आपत्ती व राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना अंतर्गत मंजूर लाभार्थ्यांना लोणीकर यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप*
नैसर्गिक आपत्ती विभागाकडून  विज पडून व पुरात वाहून  मयत झालेल्या व्यक्ती तसेच वीज पडून मुळे झालेली जनावरे यांच्यासाठी  देण्यात येणारा मदत निधी  व संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना अंतर्गत कुटुंबातील कुटुंबप्रमुखाच्या मृत्यू मुळे कुटुंबावर काळाने घातलेला घाला त्यावर फुंकर घालण्याचा प्रयत्न म्हणून या योजनेअंतर्गत दारिद्र रेषे खालील कुटुंबियांना २० हजार रुपये प्रति कुटुंब धनादेशाचे वाटप केंद्र सरकारच्या माध्यमातून केले जाते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या पाठपुराव्यामुळे आज नैसर्गिक आपत्ती अंतर्गत वीज पडून मृत्यू पावलेले श्रीमती सुर्यकांता गोरखनाथ गायके आनंदगाव ता. परतुर यांना ०४ लक्ष रुपये पुरात वाहून मृत्यू पावलेले आबासाहेब मुंजाजी पवार पाटोदा ता परतुर यांच्या कुटुंबियांना ०४ लक्ष रुपयांचा धनादेश लोणीकर यांच्या हस्ते आज वाटप करण्यात आला अशोक उत्तम रसाळ चिंचोली ता. परतुर व महादेव श्रावण गिरी बाबुलतारा ता. परतुर या दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या त्यांच्या वारसांना देखील प्रत्येकी एक लक्ष रुपयाचा धनादेश आज लोणीकर यांच्या हस्ते देण्यात आला त्याचबरोबर वीज पडून दगावलेल्या जनावरां च्या मलका अर्थसहाय्य म्हणून ठराविक रक्कम दिली जाते त्याप्रमाणे हातडी ता. परतुर येथील सिद्धेश्वर जानबा बोरकर यांना ३० हजार रुपयांचा धनादेश लोणीकर यांच्या हस्ते देण्यात आला.

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत परतूर तालुक्यातील सोहळा व मंठा तालुक्यातील १० पात्र लाभार्थ्यांना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते प्रत्येकी २० हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले दारिद्र रेषेखालील कुटुंबातील कुटुंबप्रमुख असणारी व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर वारसांना केंद्र सरकार मार्फत वीस हजार रुपयांचा धनादेश दिला जातो त्यामध्ये द्वारकाबाई वाहुळे (खांडवी) बाबासाहेब आगलावे (आष्टी) जयश्री आढाव (यदलापुर) उज्वला कदम (आनंदवाडी) मीरा सोळुंके (कोरेगाव) सरस्वती काटे (परतूर) मोनिका कणसे (परतूर) विठ्ठल पवार (परतूर) सत्यभामा सावसके (परतुर) विष्णू पारडे (सिंगोना) मिराबाई कदम (उस्मानपुर) लक्ष्मी सरोदे (चिंचोली) नंदू राठोड (श्रीष्टी तांडा) विलास अंभोरे (उस्मानपुर) कृष्णाबाई अवसारे (परतूर) भीमराव पंडित (परतुर) या १६ लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांच्या हजार रुपयाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. तर मंठा तालुक्यातील सुलोचना कांबळे (केंधळी) लक्ष्मी बनसोडे (हेलस) छाया बनसोडे (एरंडेश्वर) देविदास गिरी (गेवराई) शेख रहेमान (मंठा) कुसुम खराबे (हेलस) आशामती सरोदे (ऊस्वद) दमयंती खराबे (हेलस) परवीन शेख (मंठा) अरुणा भुतेकर (हेलस) अशा दहा लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार मंजूर करण्यात आले त्या धनादेशाचे वाटप माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले.

*चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना शाबासकीची थाप*
कामचुकार अधिकाऱ्यांना ठसवण्यात बरोबरच उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना शाबासकीची थाप देखील आज लोणीकर यांनी दिली अनेक अधिकारी अत्यंत प्रामाणिकपणे व उत्कृष्ट पद्धतीने कोरोना काळात देखील स्वतःच्या जीवाची पर्वा न करता विकासकामांसाठी स्वतःला झोकून देऊन काम करत आहेत त्यांच्या या प्रयत्नामुळे १७६ धावांची वॉटर ग्रीड शेगाव ते पंढरपूर दिंडी मार्ग यासारख्या विविध कामांना चालना मिळाली असून बहुतांश कामे पूर्णत्वाच्या दिशेने केली आहे अशा शब्दात लोणीकर यांनी चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना शाबासकीची थाप दिली

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी

आदर्श शिक्षक दिलीप मगर यांचा गुरू माऊली आबासाहेब मोरे यांच्या हस्ते सत्कार