Skip to main content

मंठा येथे लोणिकर यांच्या वाढदिवसानिमित्त जगद्गुरू तुकोबारायांच्या १०८ गाथा प्रतीचे वितरण, मित्रमंडळ दिनदर्शिका विमोचन, तर आपत्तीग्रस्त शेतकऱ्याला ११ हजार रुपयांची मदतमंठा(प्रतिनिधी)
जनसेवा हीच ईश्वरसेवा असून सत्ता असो वा नसो कायम जनसेवेसाठी तत्पर राहण्याचं व्रत आणि बसा वडिलांच्या आणि संपूर्ण लोणीकर परिवाराच्या माध्यमातून मला मिळालेला आहे त्यामुळे सत्ता असेल अथवा नसेल परंतु मी मात्र जनसेवेसाठी कायम तत्पर असेल व  तुकोबांनी सांगितलेला जनसेवेचा वसा कायम जपणार अशी भावना भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर यांनी मंठा येथे व्यक्त केले

मंठा येथे प्रा सहदेव मोरे पाटील व अरुण खराबे पाटील यांच्यावतीने राहुल लोणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त जगद्गुरु तुकोबारायांच्या 108 गाथा प्रतींची वाटप करण्यात आले त्या कार्यक्रमाप्रसंगी राहुल लोणीकर बोलत होते यावेळी भाजपा जालना जिल्हा उपाध्यक्ष गणेश राव खवणे राजेश मोरे सतीशराव निर्वळ प्रकाश टकले ह-भ-प कांगणे महाराज ह भ प रामेश्वर महाराज नालेगावकर  ह.भ.प. केदार महाराज ताठे ह भ प संतोष महाराज निर्वळ सुभाषराव राठोड नागेश घारे माऊली शेजुळ  जिंतूर भाजपा शहर अध्यक्ष राजेश वट्टमवार बाबासाहेब मोरे पाटील गजानन उफाड अशोक खलसे अशोक वायाळ विठ्ठल मामा काळे कैलास बोराडे राजेभाऊ खराबे बाळासाहेब तौर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती

जनसेवेचा वारसा आणि वसा मला कुटुंबातूनच मिळालेला आहे त्यामुळे सत्ता असेल किंवा नसेल आपण कायम जनसेवेसाठी तत्पर राहणार असून अडीअडचणीच्या आणि कठीण प्रसंगी केव्हाही आपण आवाज द्या मी तत्पर असेल अशा शब्दात राहुल लोणीकर यांनी वाढदिवसानिमित्त आयोजित गाथा वितरण दिनदर्शिका विमोचन व सत्काराला उत्तर देताना आपल्या भावना व्यक्त केल्या असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या तीवर आपला विश्वास असून कोणत्याही कठीण प्रसंगी खंबीरपणे उभे राहण्याची धमक देखील उपस्थित कार्यकर्त्यांच्या बळावरती आहे त्यामुळे प्रसंग कोणताही असो मी सेवेसाठी कायम तत्पर असेल जगद्गुरू तुकोबाराय यांनी गाथ्यात सांगितलेल्या जनसेवेच्या मार्ग प्रमाणे चालण्याचा  सातत्याने प्रयत्न करेल अशी ग्वाही राहुल लोणीकर यांनी यावेळी दिली
================
वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते परंतु काहीतरी वेगळा व आध्यात्मिक उपक्रम हाती घ्यावा असे अनेक दिवसांपासून मनोमन होते त्यामुळे आमचे नेते भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंठा तालुका व नेर- सेवली या जालना या दोन सर्कलच्या प्रत्येक गावातील एका वारकऱ्यांची निवड यावेळी करण्यात आली होती, तुकोबांची गाथा प्रत तालुक्यातील प्रत्येक गावात आमच्या माध्यमातून पोहचवता आली याचा मनस्वी आनंद आहे. या वेळी राहुल भैय्या लोणीकर मित्रमंडळ दिनदर्शिका विमोचन करण्यात आले.

*प्रा सहदेव मोरे पाटील व अरुण खराबे पाटील
(आयोजक)*
=================
*वाढदिवसानिमित्त इतर कार्यक्रमांना फाटा देत आपत्तीग्रस्त शेतकऱ्याला 11 हजार रूपयांची मदत तळणी परिसरातील कार्यकर्त्यांचा स्तुत्य उपक्रम*

भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त इतर कार्यक्रमांना फाटा देत तळणी येथे अज्ञात व्यक्तीने गणेश कुडकन नामक अल्पभूधारक शेतकऱ्यांची तूर पेटवून दिली होती त्यामध्ये कुडकन यांच्या शेतातील प्रचंड नुकसान झाले होते हतबल झालेल्या या शेतकऱ्याला राहुल लोणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त 11 हजार रुपयांचा धनादेश राहुल लोणीकर यांच्या हस्ते देण्यात आला. यासाठी नितीन सरकटे, शरद पाटील, भगवान देशमुख, अशोक राठोड, किशोर हनवते, विष्णू फुपाटे यांनी पुढाकार घेतला.
=================

Popular posts from this blog

मंठा ग्रामपंचायतचे आरक्षण सोडत संपन्न

मंठा तालूका ग्रामपंचयात संरपच आरक्षणाची सोडत आज दि.28 रोजी सकाळी अकरा वाजता तहसिल कार्यालय मंठा येथे तहसीलदार सूमन मोरे यांच्या उपस्थीत पार पडले      खालील प्रमाणे ग्रामपंचायत संरपच पदाचे आरक्षण सोडण्यात आले आहे आज जरी ग्रामपंचायात संरपाचाच आरक्षण सोडण्यात आहे परंतू महीला कि पुरूष याचे आरक्षण दि 1 फेब्रूरवारी2021 ला जालना जिल्हाधीकारी कार्यलयात सोडण्यात येणार आहे

परतूर तालूका ग्रामपंचायत आरक्षण सोडत

परतूर तालूका ग्रामपंचयात संरपच आरक्षणाची सोडत आज दि.28 रोजी सकाळी अकरा वाजता तहसिल कार्यालय परतूर येथे तहसीलदार रूपा चित्राक यांच्या उपस्थीत पार पडले      खालील प्रमाणे ग्रामपंचायत संरपच पदाचे आरक्षण सोडण्यात आले आहे आज जरी ग्रामपंचायात संरपाचाच आरक्षण सोडण्यात आहे परंतू महीला कि पुरूष याचे आरक्षण दि 1 फेब्रूरवारी2021 ला जालना जिल्हाधीकारी कार्यलयात सोडण्यात येणार आहे          

मराठवाड्या साठी परत दोन रेल्वे राज्यराणी' गुरुवारपासून तर `देवगिरी' शनिवारपासून धावणार...

परभणी, दि. 30 (प्रतिनिधी) ः नांदेडसह परभणी येथील प्रवाशांना मुंबईस जाण्यासाठी आणखी दोन रेल्वे लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सिकंदराबाद - मुंबई (सीएसएमटी) ही देवगिरी एक्स्प्रेस पाच डिसेंबरपासून (शनिवार) तर नांदेड - मुंबई (सीएसएमटी) ही राज्यराणी एक्स्प्रेस तीन डिसेंबरपासून (गुरुवार) धावणार आहे. गुरुवारपासून (दि.तीन डिसेंबरपासून) नांदेड - मुंबई (सीएसएमटी) राज्यराणी एक्स्प्रेस (क्र. 07611) ही नांदेड येथून रात्री दहा वाजता निघणार आहे. पूर्णा येथे दहा वाजून 28 मिनिटांनी पोचेल, परभणीत रात्री अकरा वाजता, मानवत येथे साडेअकरा, सेलूत 11 वाजून 55 मिनिटांना, परतूरमध्ये 12 वाजून 54 मिनिटांनी, जालनात एक वाजून 45 मिनिटांनी, औरंगाबादेत दोन वाजून 55 मिनिटांनी, लासूर येथे तीन वाजून 29 मिनिटांनी, रोटेगाव येथे चार वाजून 14 मिनिटांनी, मनमाडमध्ये सकाळी पाच वाजून 20 मिनिटांनी, नाशिकमध्ये सकाळी सहा वाजून 12 मिनिटांनी, इगतपुरी येथे सात वाजून 20 मिनिटांनी, कल्याण येथे आठ वाजून 53 मिनिटांनी, ठाण्यात नऊ वाजून 13 मिनिटांनी तर छत्रपती शिवाजी महाराज टरमिनस येथे सकाळी दहा वाजून सात मिनिटांनी प