या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार PM किसान सन्मान योजनेचे पैसे



नवी दिल्ली - PM किसान सन्मान योजनेच्या सातव्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. या योजनेच्या सातव्या हप्त्याची रक्कम कधी जमा होणार याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे. मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांना संबोधित करताना सांगितले की पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या सातव्या हप्त्याची रक्कम माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. म्हणजेच ही रक्कम २५ डिसेंबर रोजी जारी करण्यात येणार आहे.
मोदी सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा केले जातात. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या रूपात जमा केली जाते. त्याचप्रमाणे Rft Signed by State Government असे लिहून आले असेल तर त्याचा अर्थ Request For Transfer म्हणजेच माहिती तपासण्यात आली आहे. तसेच ती पुढील प्रक्रियेसाठी ट्रान्सफर केली जाईल. याचा अर्थ काही काळाने तुमच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता जमा केला जाईल.
FTO चा पूर्ण अर्थ Fund Transfer Order असा आहे. याचा अर्थ असा आहे की, राज्य सरकारने लाभार्थ्यांच्या आधार क्रमांक, बँक खात्यांची संख्या आणि बँकांचे आयएफएससी कोडसह अन्य विवरण प्रमाणित करण्यात आले आहे. तुमच्या हप्त्याची रक्कम तयार आहे आणि सरकारकडून तुमच्या बँक खात्यांमध्ये पाठवण्याचे आदेश दिले आहे.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती