भारतीय रेल्वे देत आहे नवीन सुवीधा तुमचे लगेज तुमच्या घरा पर्यंत पोहचवेल


नवी दिल्ली :भारतीय रेल्वे ने आता  प्रवाशांचा प्रवास सुखवर आणि आरामदायी व्हावा यासाठी .नेहमी वेगवेगळ्या सुविधा सुरु करत असते. यावेळी तर भारतीय रेल्वेने तुमची बॅग घरापासून रेल्वे स्टेशन किंवा रेल्वे स्टेशनपासून घरी घेऊन जाण्यासाठी विशेष सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने आता प्रवाशांना त्यांची बॅग किंवा लगेज उचलण्यासाठी जास्त कष्ट घेण्याची आवश्यकता भासणार नाही. कारण रेल्वे प्रशासन ते काम करणार आहे (Indian Railways end to end luggage parcel service).

पश्चिम रेल्वे प्रशासनाने ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर सर्वात आधी ही सुविधा सुरु करण्यात आली. NINFRIS च्या अंतर्गत ही सुविधा सुरु करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. हीच सुविधा आगामी काळात सर्वच रेल्वे स्टेशनवर सुरु करण्याचं ध्येय आहे. 

यासुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना Bookbaggage.com वेबसाईटवर बुकिंग करणं आवश्यक असेल. तिथे प्रवाशांना लगेजची साईज आणि वजन यासंबंधित माहिती द्यावी लागेल. या माहितीच्या आधारावर प्रवेशांना सर्व्हिस चार्ज द्यावा लागेल (Indian Railways end to end luggage parcel service).

प्रवाशांना या सुविधेचा नक्की चांगला फायदा होईल. रेल्वे प्रशासनाने कोरोना काळात प्रवाशांच्या सोईसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यामध्ये रेल्वे स्टेशनवर ऑटोमॅटिक तिकिट चेकिंग मशीन, मेडिकल असिस्टंट रोबोट यांसारख्या अनेक सुविधा आहेत.



Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती