सर्वांनी मिळून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करावे- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन,कृषी उत्पन्न बाजार समिती मंठा येथे भाजपाच्या वतीने समर्पण दिनानिमित्त पंडित दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन


मंठ(प्रतिनिधी)

जनसंघाच्या निर्मितीपासून पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पाहिले असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून व सर्व सामान्य व्यक्तीच्या सहकार्यातून आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण होणे आवश्यक असून त्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहणे आवश्यक असल्याचे मत भाजपा नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले

कृषी उत्पन्न बाजार समिती मंठा येथे आयोजित समोर पण दिनानिमित्त पंडित दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन करण्यासाठी आयोजित कार्यक्रम प्रसंगी आमदार लोणीकर बोलत होते यावेळी भाजपा जालना जिल्हा उपाध्यक्ष गणेशराव खवणे, ज्ञानेश्वर शेजुळ, तालुकाध्यक्ष सतीशराव निर्वळ सभापती संदीप भैय्या गोरे उपसभापती राजेश मोरे पंचायत समिती उपसभापती नागेश घारे महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष जिजाबाई जाधव माजी नगराध्यक्ष कैलास बोराडे विठ्ठलराव काळे नाथराव काकडे उद्धवराव गोंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती

पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या माध्यमातून जनसंघ का पासून भारतीय जनता पार्टीचे सुरुवात झाली असून ०२ खासदारांच्या संख्या पासून ते आज ३०३ खासदारांपर्यंत भारतीय जनता पार्टी पोहोचली आहे भारतीय जनता पार्टी आज जगातील क्रमांक एकचा पक्ष बनला आहे त्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय यांची कार्यपद्धती ध्येय धोरणे विचारधारा या सर्व बाबींचा विचार आपणास करावा लागेल पंडित जी यांनी  भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना समर्पणाची  शिकवण दिली  त्यामुळे पंडित दीनदयाल उपाध्याय यांची पुण्यतिथी संपूर्ण देशभरात समर्पण दिन म्हणून साजरी केली जाते असेही माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यावेळी म्हणाले

भारतीय जनता पार्टी हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष असून कार्यकर्त्यांच्या बळावरच भारतीय जनता पार्टीने आजपर्यंतचा आपला प्रवास पूर्ण केला आहे यापुढे देखील कार्यकर्ता केंद्रबिंदू ठेवूनच भारतीय जनता पार्टी काम करणार आहे त्यामुळेच इतर पक्षांच्या तुलनेत भारतीय जनता पार्टीला जनाधार अधिक आहे असेही लोणीकर यावेळी म्हणाले 

पंडित दीनदयाल उपाध्याय यांना समर्पण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी मान्यवरांसह अंकुशराव कदम संजय गायकवाड नरसिंग राठोड गणेशराव शहाणे मुस्तफा पठाण प्रकाश मुळे डॉ. शरद पालवे विकास पालवे प्रसादराव गडदे प्रसाद बोराडे सखाराम दादा बोराडे अंसाबाई राठोड जयश्री पवार राजेभाऊ खराबे सोपानराव वायाळ गणेशराव खैरे शिवाजीराव ढवळे अरुण खराबे राजेभाऊ नरवडे प्रमोद बोराडे दिलीप जोशी कोमल कुचेरिया भागवत डोंगरे समाधान वाघमारे प्रमोद भालेकर गजानन शिंदे गोविंद केंधळे अशोक डोके त्र्यंबक हजारे सुरेश राठोड बाबासाहेब सरकटे कांतराव जाधव नारायणराव बागल सुभाषराव बागल यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती