वाटुर येथे युवा वारियर्स शाखेच्या नामफलकाचे राहुल लोणीकर यांच्या हस्ते अनावरण,युवा वारियर्स म्हणजे युवकांमधील सुप्तगुणांना संधी देण्याचे व्यासपीठ-प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर


परतुर प्रतिनिधी आज राज्यभरात मध्ये युवा  वारियर्स च्या बाराशे शाखांच्या नामफलकाचे अनावरण होत असून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील व युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सिंहगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून युवा वारियर्स या युवक आतील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या शाखे चे उदघाटन करतानाच राज्यभर  आशा प्रकारच्या शाखांचे2 उद्घाटने होत असल्याचे होत असल्याचे भाजपा युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी वाटुर येथे वटुर पंचायत समिती गणाच्या युवा वारियर्स शाखेच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले
यावेळी बोलताना राहुल लोणीकर म्हणाले की युवा अवस्थेतील मुला-मुलींना आपल्यातील नेतृत्व गुण त्याचबरोबर विविध क्षेत्रात असलेली हातोटी व त्यांच्यात असलेले कलागुण यांना या युवा वारियर च्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध होणार आहे त्यामुळे युवकांनी युवा वारियर च्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करावी असेही सांगितले पुढे बोलताना ते म्हणाले की  जास्तीत जास्त युवकांनी युवा वारियर च्या माध्यमातून सक्रिय व्हावे असे आवाहन यावेळी त्यांनी युवकांना केले यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष रमेश भापकर युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शत्रुघ्न कणसे उद्धव वायाळ राजेंद्र वायाळ जगदीश पडोळकर संभाजी वारे इस्माईल पठाण प्रकाश वाघमारे यांच्यासह   युवा वारियर्स चे पदाधिकारी उपस्थित होते

Popular posts from this blog

परतूर -सेलू रोडवर चिंचोली जवळ भिषण अपघात ,एक जागिच ठार तर तीघे गंभीर जखमि

यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सातोना येथे 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा

नेर येथील कौशल्याबाई लाहोटी यांचे नेत्रदान