मोलमजुरीतून वाचवलेले पैसे वृद्धेने दिले राममंदिर साठी !

परतूर (प्रतिनिधी )-श्रीराम मंदिर निर्माण अभियानात आज विविध स्तरातून देणगीचा येत असताना लहान मुले आपले बचतीचे पैसे राम मंदिर निर्माणासाठी देत आहेत तर दुसरीकडे रिक्षावाले हातगाडीवाले तर काही ठिकाणी चक्क भिकाऱ्यांनी आपल्या बिग मागितलेल्या पैशातून या अभियानात देणगी दिलेली आहे अशाच प्रकारे परतूर तालुक्यातील पाटोदा येथील अत्यंत वृद्धावस्थेत जवकेल असे काम करून, आपला उदरनिर्वाह भागविणाऱ्या व मोल-मजुरीतुन बचत केलेले एका वृध्द मातेने जमवलेले 500/रु.श्रीराम मंदिर निर्माण कार्यास सर्मपण केले. वृध्द माउली चे नाव सीताबाई तुकाराम झाटे असून त्या पाटोदा ( माव ) येथील रहिवासी आहेत . पती व दोन मुले अवेळी स्वर्गवासी झाले . म्हातारपणी एकटे राहून कष्ट करून पोट भरत असतांना हि प्रभू श्रीरामावरची श्रद्धा तुसभरही कमी झाली नाही. रामाचा वनवास संपला आता त्याचे घर रुपी मंदिर माझ्या जिवंतपणी पाहायला मिळेल, व माझेही कणभर योगदान यात राहील हे माझे भाग्य आहे असे गहिवरलेल्या सीताबाई यांनी सांगितले. त्यांचे हे योगदान कोटींपेक्षा मोठे असून अमूल्य आहे व इतरांना प्रेरणा देणारे आहे. असे यावेळी संकलक सुभाष अण्णा अँभूरे यांनी सांगितले, या वेळी सुरेश पाटोदकर, योगेश दहिवाल, विठ्ठल कुलकर्णी सह अनेक रामसेवक उपस्थित होते.

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात