Skip to main content

आष्टी येथील रूरबन अंतर्गत विविध विकास कामांचे उद्घाटन,सरकारच्या उदासीनतेमुळे अनेक प्रकल्पांची कामे रखडली-माजी मंत्री बबनराव लोणीकर


परतूर (प्रतिनिधी )केंद्र सरकार ची डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी  रुरबन योजना ही महाराष्ट्र राज्यातील केवळ सात जिल्ह्यांमध्ये राबवली गेली या योजनेमध्ये जालना जिल्ह्यातील आष्टी व परिसरातील सोळा गावांचा समावेश करण्यात आला या माध्यमातून आष्टी व परिसरातील गाव समूहांचा मोठ्या प्रमाणात विकास साधला गेल्याचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले ते आष्टी येथे आष्टी शहरांतर्गत रस्ते व आष्टी शहरातील अंतर्गत पाईपलाईन च्या कामाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते
पुढे बोलताना माजी मंत्री लोणीकर म्हणाले की रूरबन योजनेच्या माध्यमातून आष्टी शहरासाठी एकशे पंचवीस कोटी रुपयांचा निधी आपण मंत्री असताना मंजूर करून घेतला आज आष्टी गावातील 4 कोटी रुपयांच्या अंतर्गत रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन होत असल्याचा आपणास आनंद असून गेल्या कित्येक महिन्यांपासून निधीअभावी रखडलेली 3 कोटी रुपयांची अंतर्गत पाईपलाईन  अंथरन्याची योजना आपण प्रयत्न पूर्वक मार्गी लावली असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले.
======================
  *सरकारच्या उदासीनते मुळे मिनी एम  आय डी सी प्रकल्प रखडला*
=======================
सरकारच्या दुर्लक्षामुळे आष्टी सारख्या ग्रामीण भागामध्ये आपण प्रयत्नपूर्वक मंजूर करून  आणलेला  शेतकऱ्यांसाठी चा मिनी एमआयडीसी प्रकल्प रखडला असल्याची टीका माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी यावेळी केली या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी गटांनी फळप्रक्रिया उद्योगासाठी पुढाकार घेत कंपन्याचे रजिस्ट्रेशन केले होते मात्र सद्यस्थितीमध्ये पालकमंत्री व सरकारच्या दुर्लक्षामुळे सदरील प्रकल्प रखडला असून या प्रकल्पाच्या माध्यमातून 27 च्या वर कंपन्या फळ प्रक्रिया उद्योग सुरू करणार होत्या मात्र शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता या प्रकल्पाकडे मुद्दाम हून डोळेझाक करत हा प्रकल्प रखडत ठेवण्यात आल्याची टीका माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी यावेळी केली
      पुढे बोलताना माजी मंत्री लोणीकर म्हणाले की मतदार संघाच्या विकासासाठी 6 हजार 700 कोटी रुपयांचा निधी आणला या निधी मधून  मतदार संघात अनेक विकास कामे झाली आष्टी सारख्या गावामध्ये एकशे पंचवीस कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण खेचून आणला त्यामुळे आष्टी शहरातील बस स्थानक असेल सिमेंट रस्ते असतील पाईप लाईन असेल वीज वितरण कंपनीचे कामे असतील इत्यादी कामे होत असल्याचे त्यांनी सांगितले
      यावेळी भाजयुमो प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर,मदनलाल सिंगी,रमेश भापकर, रामप्रसाद थोरात, रंगनाथ येवले, खंडेराव पाटिल, बाबाराव थोरात, अरुणराव जोशी, नारायण पळसे, गणपत आप्पा सातपुते, मोहनराव आठवे, रामदास सोळंके,दादाराव चौरे, शत्रुघ्न कणसे, मधुकर मोरे, अनंता आगलावे, बबलु सातपुते,बळीराम थोरात,बाळासाहेब फुलारी,नसरूल्ला काकड,अल्ताफ कुरेसी, दीपक सातपुते, प्रकाश सातपुते महादेव वाघमारे, बाळासाहेब पवार, माउली सोळंके,राजेश दवंडे,बब्बू शेख  आदि उपस्थित होते

Popular posts from this blog

मंठा ग्रामपंचायतचे आरक्षण सोडत संपन्न

मंठा तालूका ग्रामपंचयात संरपच आरक्षणाची सोडत आज दि.28 रोजी सकाळी अकरा वाजता तहसिल कार्यालय मंठा येथे तहसीलदार सूमन मोरे यांच्या उपस्थीत पार पडले      खालील प्रमाणे ग्रामपंचायत संरपच पदाचे आरक्षण सोडण्यात आले आहे आज जरी ग्रामपंचायात संरपाचाच आरक्षण सोडण्यात आहे परंतू महीला कि पुरूष याचे आरक्षण दि 1 फेब्रूरवारी2021 ला जालना जिल्हाधीकारी कार्यलयात सोडण्यात येणार आहे

परतूर तालूका ग्रामपंचायत आरक्षण सोडत

परतूर तालूका ग्रामपंचयात संरपच आरक्षणाची सोडत आज दि.28 रोजी सकाळी अकरा वाजता तहसिल कार्यालय परतूर येथे तहसीलदार रूपा चित्राक यांच्या उपस्थीत पार पडले      खालील प्रमाणे ग्रामपंचायत संरपच पदाचे आरक्षण सोडण्यात आले आहे आज जरी ग्रामपंचायात संरपाचाच आरक्षण सोडण्यात आहे परंतू महीला कि पुरूष याचे आरक्षण दि 1 फेब्रूरवारी2021 ला जालना जिल्हाधीकारी कार्यलयात सोडण्यात येणार आहे          

मराठवाड्या साठी परत दोन रेल्वे राज्यराणी' गुरुवारपासून तर `देवगिरी' शनिवारपासून धावणार...

परभणी, दि. 30 (प्रतिनिधी) ः नांदेडसह परभणी येथील प्रवाशांना मुंबईस जाण्यासाठी आणखी दोन रेल्वे लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सिकंदराबाद - मुंबई (सीएसएमटी) ही देवगिरी एक्स्प्रेस पाच डिसेंबरपासून (शनिवार) तर नांदेड - मुंबई (सीएसएमटी) ही राज्यराणी एक्स्प्रेस तीन डिसेंबरपासून (गुरुवार) धावणार आहे. गुरुवारपासून (दि.तीन डिसेंबरपासून) नांदेड - मुंबई (सीएसएमटी) राज्यराणी एक्स्प्रेस (क्र. 07611) ही नांदेड येथून रात्री दहा वाजता निघणार आहे. पूर्णा येथे दहा वाजून 28 मिनिटांनी पोचेल, परभणीत रात्री अकरा वाजता, मानवत येथे साडेअकरा, सेलूत 11 वाजून 55 मिनिटांना, परतूरमध्ये 12 वाजून 54 मिनिटांनी, जालनात एक वाजून 45 मिनिटांनी, औरंगाबादेत दोन वाजून 55 मिनिटांनी, लासूर येथे तीन वाजून 29 मिनिटांनी, रोटेगाव येथे चार वाजून 14 मिनिटांनी, मनमाडमध्ये सकाळी पाच वाजून 20 मिनिटांनी, नाशिकमध्ये सकाळी सहा वाजून 12 मिनिटांनी, इगतपुरी येथे सात वाजून 20 मिनिटांनी, कल्याण येथे आठ वाजून 53 मिनिटांनी, ठाण्यात नऊ वाजून 13 मिनिटांनी तर छत्रपती शिवाजी महाराज टरमिनस येथे सकाळी दहा वाजून सात मिनिटांनी प