महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदस्य नोंदणी , परतुर येथे बैठक घेऊन सदस्य नोंदणी कारण्यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी मार्गदर्शन केले,

प्रतिनिधी / परतुर...
महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदस्य नोंदणीला आज पासून सुरुवात झाली, परतूर ९९ विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांनी व राज ठाकरे यांच्यावर प्रेम करणार्‍या तरुणांनी मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी सहभाग घेतला  राज ठाकरे यांचा विचार घराघरात पोहोचण्यासाठी आपण सगळे रक्ताचे पाणी करू व  महाराष्ट्र नवनिर्माण करुया हा संकल्प करूण सदस्य नोंदणीला सुरुवात केली
        सदस्य नोंदणी ऑफलाइन नोंदणी कराण्यासठी मनसे पदाधिकारी यांच्या कडे सदस्य नोंदणीचे फॉर्म देऊन नियोजन केले, तसेच परतूर-मंठा नेर,शेवली, विधानसभा मतदार संघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करा,किंवा ऑनलाइन सदस्य नोंदणी करायचे असेल तर आपण स्कॅन करून सुद्धा करू शकता, या नंतर आपण या क्रमांकावर ९९२०४५६७८९ मिस कॉल करून सदस्य नोंदणी करता येईल, जास्तीत जास्त संख्येने नवीन सदस्यानी भाग घ्यावा कारण येणाऱ्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे लोकसभेत लोकसभा सदस्य असणार व महाराष्ट्राच्या विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना सत्तेत असणार याबाबत कोणाच्याही मनात शंका यायला नको, कारण काळ बदलत राहतो काळानुसार वेळ सुद्धा बदलत राहते म्हणून अनेक बदल आपण या महाराष्ट्र देशात बघितलेले आणि हा बदल सुद्धा आपण बघणार आहोत याचे साक्षीदार आपण असो  राज ठाकरे यांची महाराष्ट्रा व मराठी माणसाच्या बद्दल असलेली भूमिका विचार निश्चितच हा विचार महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही, शेवटी असेही मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी विश्वास व्यक्त केला या बैठकीस उपस्थित कृष्णा गोवर्धन सोळंके तालुकाध्यक्ष परतुर, रामजी नवल , अविनाश बिडवे, बाळू जाधव, महारुद्र टेकाळे, संदीप पाचारे, मनोज बांडगे, सतीश सुरुंग, पांडुरंग सुरुंग, सोपान गोरे, सुरेश सुरुंग,अर्जुन वटाणे, ज्ञानेश्वर पुणेकर, निलेश सोळंके, कृष्णा प्रकाश सोळंके,विश्वंभर कुलकर्णी, इत्यादी पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते..‌.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी

आदर्श शिक्षक दिलीप मगर यांचा गुरू माऊली आबासाहेब मोरे यांच्या हस्ते सत्कार