शेतकर्यांना त्रास दिला तर बँकेच्या प्रशासकाचे कपडे फाडु मनसे विद्यार्थी सेनेचा ईशारा

   मंठा (प्रतीनीधी)तालुक्यातील मंठा अर्बन बँक सध्या आडचणीत सापडली आहे. ठेवीदारांचे लाखो रुपये बँकेमध्ये आडकलेले आसतांना बँकेमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झालेला आहे. यामुळे बँक आडचणीत आहे. धनदांडग्या लोकांनी बँकेला मोठ्या प्रमाणात ललुटलेले आहे. आणि बँक आडचणीत आणली आहे. ठेवीदारांचे पैसे बँकेने परत करने म्हणजे शेतकरी राजांकडुन वसुली करणे नव्हे, आसे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी म्हटले आहे. मंठा तालुक्यातील गोर गरीब शेतकर्‍यांना बंकेने नोटिसा काढुन त्रास देऊ नये, व शेतकर्यांकडे वसुलीसाठी तगादा लावता कामा नये अन्यथा बँकेला जो प्रशासक दिला आहे.त्यांचे कपडे फाडण्याचे काम महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना करेल आसा ईशाराच मनसेचे आक्रमक म्हणुन ओळखले जाणारे सिध्देश्वर काकडे यांनी दिला आहे. सबंधीत बँकेतील लोकांनी बँकेमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करुन ठेवला आहे आगोदर त्याची चौकशी करुन सबंधीतांवर कार्यवाही करावी मगच शेतकर्‍यांकडुन वसुली करावी आसी मागणी मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. आपण जिल्हा उपनिबंधक जालना डि डि आर यांच्या सोबत देखील चर्चा केली आहे. या संदर्भात त्यांनी देखील शेतकर्‍यांवर अन्याय होणार नसल्याचे सांगितले आहे. पण बँकेला नेमुन दिलेले प्रशासक म्हणुन श्री भालेराव हे शेतकर्‍यांना वेठीस धरत आहेत. विनाकारण नोटीस काढुन शेतकर्‍यांना त्रास दिला जात आसल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी म्हटले आहे. आपण पोलीस केसेसला घाबरणार नसुन शेतकरी राजासाठी १०० पोलीस केसेस घेऊ आसा ईशाराच मनसेचे काकडे यांनी दिला आहे. बँकेतील सबंधीत लोकांची तातडीने चौकशी करावी या साठी आपण सबंधीतांकडे तक्रार देखील दाखल केली आसुन आगोदर बँकेतील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, व भ्रष्टाचार ऊघड करुन ठेवीदारांना त्यांचा पैसा परत करावा आसी मागणी काकडे यांनी केली आहे. जर यापुढे प्रशासनाने शेतकर्‍यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मनसे स्टाईलने सबंधीत आधिकार्यांचे कपडे फाडुन तोंडाला काळे लाऊ आसा ईशाराच मनसेकडुन देण्यात आला आहे.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती