अचानकपणे लॉकडाऊन सादृष्य निर्बध लादल्याने सर्वसामान्य कष्टकरी,छोटे व्यापारी अडचणीत,सर्वसामान्य जनतेचा उद्रेक होण्याची शक्यता,सर्वसामान्य जनतेची व्यवस्था करा,मगच कडक निर्बंध लादा -माजी मंत्री बबनराव लोणीकर

परतूर(प्रतिनधी) सरकारने हप्त्यात  शनिवार रविवार असे दोन दिवस लॉक डाउन करण्याची घोषणा केली होती मात्र राज्यात इतर दिवशी लॉक डाउन सादृश्य कडक निर्बंध लादल्याने सर्वसामान्य जनता त्याचबरोबर हातावर पोट असलेले छोटे व्यवसायिक यांचा उद्रेक होण्याची शक्यता असून माननीय मुख्यमंत्री यांनी व सरकारने सर्वसामान्यांच्या गरजांची पूर्तता करून मग खडक निर्बंध लावावे असे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात ही मागणी केली असून पुढे या पत्रात म्हटले आहे की मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून सहकार्य करण्याचे आवाहन केले होते या अनुषंगाने राज्यामध्ये शुक्रवारी रात्रीपासून ते सोमवारी सकाळपर्यंत आता प्रत्येक हप्त्याच्या शेवटी लॉकडाउन डाऊन करण्यात येणार होता मात्र सरकारने कडक निर्बंधांचा नावाखाली  लॉक डाऊन सदस्य निर्बंध घातल्याने हातावर पोट असणाऱ्या ची पंचायत झाली असून छोटे व्यापारी मजूर कष्टकरी यांना उपजीविका चालवण्यासाठी पॅकेज उपलब्ध करून द्यावे व नंतरच लॉक डाउन लावावा असे पत्रात नमूद करण्यात आले आहे पुढे या पत्रात म्हटले आहे की, हे निर्बंध लादताना सर्व घटकांचा विचार घेणे आवश्यक होते मात्र असे न करता अचानक पणे सदृश्य परिस्थिती निर्माण करून सरकारने सर्वसामान्यांच्या पोटावर मारू नये असे पत्रात नमूद करण्यात आले असून सर्वसामान्यांचा विचार करूनच निर्बंध लावावे असेही म्हटले आहे कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात फैलावत असून या संकटाच्या काळात सरकारने शेतकरी कष्टकरी हातावर पोट भरणारे छोटे व्यवसायिक यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करून मगच अशा प्रकारची भूमिका घ्यावी असेही पत्रात म्हटले आहे या संसर्गाच्या परिस्थितीमध्ये सर्वसामान्य गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी सरकारने उपाय योजना कराव्यात असे शेवटी नमूद करण्यात आले आहे

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

नगरपालिका हाती द्या शहराच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही,नगरपालिकेची सत्ता हाती दिल्यास, परतुर शहरासाठी उद्यान, सार्वजनिक शौचालय संपूर्ण शहरातील अंतर्गत रस्ते, शहर सुशोभीकरणासाठी निधी आणणार

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण