परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे तालुक्यातील यश प्राथमिक व माध्यमिक विद्यालय तसेच यश इंग्लिश स्कूल सातोना येथे आज भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.श्री सुरेश लहाने यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयराम खंदारे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव मिळून त्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने महेश भाऊ सितारामजी आकात यांनी सुरू केलेल्या संकल्पनेनुसार दरवर्षीप्रमणे याही वर्षी यश अर्बन को. ऑ.क्रे.सो.ली. परतूर यांच्या वतीने वर्ग १०वी परीक्षेत गुणवंत आलेल्या विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार करण्यात आला. जि. प.प्रशाला सातोना खुर्द यथील कु शिंदे पूजा अनिल, पानझडे गीता विष्णू,प्रधान माया मनोज, आकात पूजा कृष्णा तसेच यश प्रा. व मा. विद्यालय सातोना खुर्द येथील प्रणव महादेव लाटे, अनुजा रंजीत लाटे, श्रद्धा बालासाहेब आकात, आदित्य दीपक पानशेवडीकर, वैष्णवी अशोक झोल, श्रद्धा राजेभाऊ काळे या विद्यार्थ्यांचा शाल,सन्मानचिन्ह,धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. या बरोबरच प्रशालेतील अभिनव डांगरे या विद्यार्थ्याने महेश भाऊ