आंबेडकर नगरात घराघरात साजरी झाली तथागत गौतम बुद्ध जयंती !

lपरतूर,दि.26 (प्रतिनिधी) -विश्वशांतीदुत तथागत गौतम बुद्ध  यांची २५८३  वी जयंती बुधवारी (दि.(२६ )  शहरात मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता घराघरात मनोभावे व शांततेने  बुद्धवंदना घेऊन विश्वशांतीदुताला अभिवादन करण्यात आले.
      शहरातील डॉ. आंबेडकरनगरात कोरोना नियमांचे पालन करत घरातच जयंती साजरी करण्यात आली.
   यावेळी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांनी आपल्या कुटुंबासमवेत तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामुदायिक वंदना घेतली. दीपप्रज्वलन करून अभिवादन केले. यावेळी पाडेवार म्हणाले की,सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना महामारीने थैमान घातले आहे.राज्यात कोरोनाचा वाढता प्रभाव व कोरोनामुळे मृत्युमुखी पडणारांची संख्या पाहता शासनाने काही नियम घालून दिले आहेत.अनुयायांनी शासनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.शासनाच्या निर्देशांचे पालन करत तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त सर्व आंबेडकरी अनुयायांनी रस्त्यावर गर्दी न करता आपआपल्या गावातील  बौद्ध विहारात मोजक्याच उपासकाच्या उपस्थिती मध्ये दीपप्रज्वलन करून बौद्ध वंदना घेऊन तथागत गौतम बुद्ध यांची जयंती सर्व  बौद्ध बांधवानी आपल्या कुटुंबासमवेत घरातच साजरी केली, जगावरील कोरानाचे संकट लवकर दुर होवो अशी प्रार्थना यावेळी बौद्ध अनुयायी यांनी केली, यावेळी अर्जुन पाडेवार, संजना पाडेवार आर्या पाडेवार, करण पाडेवार, अजय पाडेवार, यांची उपस्थिती होती,

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

नगरपालिका हाती द्या शहराच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही,नगरपालिकेची सत्ता हाती दिल्यास, परतुर शहरासाठी उद्यान, सार्वजनिक शौचालय संपूर्ण शहरातील अंतर्गत रस्ते, शहर सुशोभीकरणासाठी निधी आणणार

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण